मुंबई :
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे. सरनाईक यांच्या घरासह त्यांच्या कार्यालयावर छापा टाकला असून तपास सुरु आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीला प्रताप सरनाईक यांच्यावर संशय आहे. त्यामुळे ठाण्यात 10 ठिकाणी ईडीच्या पथकाकडून पाहणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी ‘आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. हिंमत असेल तर घरी या आणि अटक करा’, असे म्हणत भाजपला आव्हान दिले आहे.
पुढे त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. ईडीनं आपली एक शाखा भाजप कार्यालयात उघडल्याचा टोला राऊत यांनी लगावला आहे. आमच्या आमदार, खासदारांच्या घरासमोर ईडीनं तळ ठोकला तरी आम्ही घाबरणार नाही, अशा इशाराच राऊत यांनी दिला आहे. ‘प्रताप सरनाईक घरी नसताना त्यांच्या घरावर टाकलेला छापा म्हणजे नामर्दानगी आहे. दिल्लीतूनच नाही तर इंटरपोलची टीम आली तरीही काही फरक पडणार नाही. भाजपनं सरळ लढाई करावी. शिखंडीसारखं ईडी किंवा सीबीआयचं बाहुलं हाती धरुन कारवाई केली तरी आम्ही घाबरत नाही’, असं आव्हानच संजय राऊत यांनी भाजपला दिलं आहे.
2 महिन्यात राज्यात सत्तापालट होऊन भाजपचं सरकार येईल, असा दावा भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. त्यावर साम, दाम, दंड, भेदात आमची डॉक्टरेट झाली आहे. त्यातूनच आमचा जन्म झाला आहे. त्यामुळे साम, दाम, दंड, भेदाची भाषा आमच्यासमोर करु नका, असा दम संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना भरला आहे.
संपादन : स्वप्नील पवार
- ब्रेकिंग : आता राज्यात पुन्हा होणार 5000 ग्रामपंचायतीच्या निवडणुका; ‘या’ कालावधीत उडणार बार
- मोठी बातमी… राज्यात पुन्हा होणार निवडणुका; ‘यावेळी’ होणार 27 झेडपी, 20 महापालिका, 625 नगरपालिका व पंचायत समितीच्या निवडणूकांचा धमाका
- जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते खाद्यतेल आहे चांगले; वाचा महत्वाची माहिती
- घरच्याघरी बनवा ‘हे’ तेल आणि वेदनेपासून मिळवा मुक्ती
- व्हॉट्सअॅपवर मोदी सरकारची कठोर कारवाई; वाचा, नेमकं काय केलंय सरकारने