विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता; वाचा, हवामानाचा अंदाज

मुंबई :

सध्या राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे हवेत काही प्रमाणात गारवा तयार होत असून किमान तापमानात चढउतार होत आहे. राज्यातील अनेक भागात पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. तरीही मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर झाले असून त्यामुळे आसपासच्या राज्यांना अलर्ट देण्यात आलेला आहे. या चक्रीवादाळाचे परिणाम महाराष्ट्रातही दिसणार आहेत. २५ नोव्हेंबरला विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. २६ नोव्हेंबर रोजी विदर्भात काही ठिकाणी तर, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. २७ नोव्हेंबरला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्रासह तामिळनाडु, पॉडेचरी येथेही या चक्रीवादळाचे परिणाम दिसून येणार आहेत. महाराष्ट्रात भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात २६ नोव्हेंबर रोजी सर्वदूर हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. २६ नोव्हेंबर रोजी २७ नोव्हेंबर रोजी सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here