गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरमध्ये कमावले 16.5 लाख कोटी; ‘या’ शेअर्सच्या आधारे बाजाराने रचला नवा विक्रम

मुंबई :

शेअर बाजाराने आज म्हणजे 24 नोव्हेंबरच्या व्यवसायात नवीन विक्रम नोंदविला आहे. जेव्हा सेन्सेक्सने प्रथमच 4,4500 च्या पातळीला टच केला तेव्हा निफ्टीनेही प्रथमच 13000 ची पातळी पार केली आणि 13050 वर पोहोचला. नोव्हेंबर महिन्याबद्दल बोलायचे तर सेन्सेक्स आणि निफ्टी दिवसेंदिवस नवे विक्रम नोंदवित आहेत. दिवाळीच्या या महिन्यात बाजारातील गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे. नोव्हेंबरमध्ये गुंतवणूकदारांनी बाजारातून सुमारे 16.5 लाख कोटींची कमाई केली आहे.

मोठ्या शेअर्सबरोबरच लघु व मध्यम शेअर्सनीही बाजारातील तेजीला हातभार लावला आहे. नोव्हेंबर महिन्यातच सेन्सेक्स आतापर्यंत जवळपास 12 टक्के बळकट झाला आहे. निफ्टीनेही दुहेरी आकड्यात तेजी आणली आहे. मिडकैप आणि स्मालकैप शेअर्समध्येही अवघ्या १७ दिवसात तेजी आली आहे.

नोव्हेंबर महिना शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी चांगला जात आहे. यावेळी, बीएसई वर लिस्टेड कंपन्यांची बाजारपेठ 16.5 लाख कोटींपेक्षा जास्त वाढली आहे. 30 ऑक्टोबरला बीएसईच्या लिस्टेड कंपन्यांची मार्केट कॅप 1,57,92,249.91 कोटी होती. 24 नोव्हेंबरच्या व्यवसायात ही 1,74,57,717.90 कोटींपेक्षा जास्त आहे. म्हणजेच 17 व्यापार दिवसांमध्ये गुंतवणूकदारांची संपत्ती 16.5 लाख कोटींनी वाढली आहे.

या फ्रंटलाइन शेअर्सचे योगदान :-  (1 महिन्याचे  टॉप गेनर्स)

बजाज फिनसर्व: 51 टक्के
बजाज फाइनेंस: 44 टक्के
श्रीराम ट्रांसपोर्ट फाइनेंस: 44 टक्के
कोटक महिंद्रा बैंक: 39 टक्के
इंडसइंड बैंक: 39 टक्के
टाटा स्टील: 29 टक्के
टाटा मोटर्स: 27 टक्के
RBL बैंक: 27 टक्के
M&M फाइनेंशियल: 25 टक्के
MRF: 25 टक्के
आयशर मोटर्स: 23 टक्के

या मध्यम आणि लहान शेअर्सचा हातभार (1 महिन्यातील टॉप गेनर्स)

J&K बैंक: 75 टक्के
अडानी गैस: 74 टक्के
अडानी ग्रीन: 68 टक्के
गायत्री प्रोजेक्ट: 65 टक्के
अपोलो पाइप्स: 59 टक्के
थॉमस कुक: 51 टक्के
स्नोमैन लॉजिस्टिक: 49 टक्के
चोला इन्वेस्टमेंट एंड फाइनेंशियल: 44 टक्के
अडानी ट्रांसमिशन: 30 टक्के
अडानी इंटरप्राइजेज: 29 टक्के

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here