दाऊदची रत्नागिरीतील हवेली ‘एवढ्या’ कवडीमोल भावात विकली; लोटेतील जमिनीचा 1 डिसेंबरला लिलाव

रत्नागिरी :

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव चालू झाला असून अवघ्या कवडीमोल भावात त्याची जंगी प्रॉपर्टी लिलावात दिली जात आहे. दाऊद इब्राहिमच्या लोटे इथल्या जागेची आज केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी होणार आहे. नंतर त्यानंतर 1 डिसेंबरला त्या जमिनीचा लिलाव केला जाणार आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्याची कोकणात असलेली टोलेजंग हवेली 11 लाख 20 हजार रुपयांना विकण्यात आली आहे. ही हवेली रत्नागिरीत येते. त्याच्या इतर मालमत्तेचा अद्यापही लिलाव सुरु असून सेफमा अर्थात स्मगलर्स अँड फॉरेन एक्सचेंज मैनिपुलेटर्स एजन्सीकडून हा लिलाव सुरु आहे.

10 नोव्हेंबरच्या लिलाव प्रक्रियेत दाऊदच्या सात पैकी सहा जागांचा लिलाव झाला होता. लोटेतील मालमत्तेचा लिलाव मागे घेण्यात आला होता. मागे घेण्यात आलेल्या जागेचा आता 1 डिसेंबर रोजी लिलाव होणार आहे. लिलावात मालमत्तेची खरेदी केलेले सुप्रीम कोर्टाचे वकील भुपेंद्रकुमार भारद्वाजसुद्धा या जागेची पाहणी करणार आहेत. व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे आता मालमत्तेचा लिलाव केला जाणार आहे.

दरम्यान मुंबकेचे माजी सरपंच अकबर दुदुके यांनी दिलेल्या माहितीनुसार दाऊद इब्राहिमचं घर आणि शेतीचा डिजीटल पद्धतीने मुंबईतून लिलाव होईल. लिलावात मुंबके गावातील स्थानिक शेतकरी सहभागी होणार नाहीत. स्थानिक इच्छुक बोली लावणारे मुंबईत जाणार नाहीत.प्रत्यक्ष जागेवर जावून लिलाव न करता व्हिडिओ कॉन्फरन्सवरुन ही लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे, अशीही माहिती त्यांनी पुढे सांगितली.

नरिमन पॉईंट येथील सफेमा कार्यालयात दाऊदच्या रत्नागिरीतील प्रॉपर्टीचा लिलाव झाला. एकूण 17 प्रॉपर्टीचा लिलाव यावेळी झाला. त्यापैकी 6 प्रॉपर्टी दाऊदच्या होत्या. तर एक प्रॉपर्टी इक्बाल मिरचीची आहे.

दाऊदची मालमत्ता :-

1) सर्व्हे नंबर 151 वरील 27 गुंठे
2) सर्व्ह नंबर 152 वरील 29.30 गुंठे
3) सर्व्हे नंबर 152 वरील 24.90 गुंठे
4) सर्व्ह नंबर 150 वरील 20 गुंठे
5) सर्व्ह नंबर 155 वरील 18 गुंठे
6) सर्व्हे नंबर 181 वरील 27 गुंठे आणि हवेली

दाऊदच्या 4,5,7 आणि 8 क्रमांकाची मालमत्ता भूपेंद्र भारद्वाज यांनी विकत घेतल्या. तर 6 आणि 9 क्रमांकाची संपत्ती अजय श्रीवास्तव यांनी-घेतली. तर दाऊदच्या 10 क्रमांकाच्या प्रॉपर्टीला परत घेण्यात आलं आहे. इकबाल मिरचीची प्रॉपर्टी यंदाही लिलावात गेली नाही. लिलावात बोली लावणाऱ्यांच्या मते त्याच्या प्रॉपर्टीची किंमत जास्त लावण्यात आली आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here