दिल्ली :
टेक्नोलॉजी क्षेत्रातील दिग्गज कंपनी गुगल आता Truecallerला टक्कर देणार आहे. टेक क्षेत्रात सर्वच ठिकाणी आपलेच वर्चस्व पाहिजे, या महत्वाकांक्षी दृष्टीने आपले गुगलने आता आपल्या खास अॅप Phone by Google चे नवीन व्हर्जन लाँच करण्याची तयारी केली आहे. या आगामी मोबाइल अॅपमध्ये युजर्सला कॉलर-आयडी आणि स्पॅम कॉल थांबविण्याची सुविधा मिळेल. सदर सुविधा देण्यात सध्या Truecaller अॅप आघाडीवर आहे. त्यामुळे गुगल Truecallerशी टक्कर घेत असल्याचे समजत आहे.
मोबाइल इंडियनच्या एका वृत्तानुसार, रेडडिटरने गुगलच्या या आगामी कॉलिंग अॅप गुगल कॉलला यूट्यूबच्या जाहिरातीवर स्पॉट केले आहे. युट्यूबवर पाहिलेल्या या जाहिरातीमध्ये ‘lets you answer with confidence’ अशी टॅगलाइन वापरली आहे.
अद्याप गुगलने सदर अॅपविषयी जाहीर माहिती सांगितलेली नाही. असे असले तरी त्यांचे काम जोरात सुरु असल्याचे दिसून आले आहे. गुगलने अद्याप गुगल कॉल लाँचिंग करण्याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. परंतु लवकरच हे अॅप सुरू होईल, अशी आशा आहे. दरम्यान, गुगलचा फोन अॅप अँड्राईड युजर्ससाठी आहे. या अॅपची खास गोष्ट म्हणजे, फोन स्क्रीन लॉक झाल्यानंतरही युजर्सला कॉलरच्या नावाची माहिती समजते. कंपनीने अलीकडेच या अॅपसाठी अनेक फीचर्स जारी केले होते.
संपादन : स्वप्नील पवार
- आठवडाभर IPO मार्केटमध्ये राहणार ‘बहार’; एका पाठोपाठ एक ‘या’ 3 कंपन्या देत आहेत मालामाल होण्याची संधी
- द्राक्ष उत्पादकांवर मोदींची कुऱ्हाड; पहा अनुदान बंदीचा काय होणार दुष्परिणाम
- PMAY-G: 6 लाख लोकांच्या खात्यात पंतप्रधान मोदींनी पाठवले 2691 कोटी; ‘असे’ मिळवा स्वस्त घर
- अशी बनवा ‘पनीर गुलकंद खीर’; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा
- असा बनवा पनीर मलई कोफ्ता; रेसिपी वाचा एका क्लिकवर