इंडसइंड बँकेसाठी आरबीआयकडून ‘ती’ बातमी; शेअरवर झाला ‘असा’ परिणाम

कलकत्ता :

हिंदुजा बंधुसाठी चांगली बातमी आली आहे. आता ते इंडसइंड बँकेतील हिस्सेदारी वाढवण्याची शक्यता आहे. तसेच कोटक महिंद्रा बँकेचे उदय कोटक यांनाही आता दिलासा मिळाला आहे. कारण आता नियामक अडचणींमुळे त्यांना आपले भागभांडवल विकावे लागणार नाही.

वास्तविक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आयबीआय) अंतर्गत वर्किंग ग्रुपने खासगी बँकांमधील प्रवर्तकांच्या हिस्स्यांची मर्यादा 26 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या गटाच्या प्रस्तावानुसार सर्व खासगी बँकांच्या प्रवर्तकांसाठी 26 टक्के पेड-अप भांडवल ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे.

परिणामी, सोमवारी इंडसइंड बँकेचे शेअर्स 5.53 टक्क्यांनी वधारून 854.85 रुपयांवर गेले. गेल्या एका महिन्यात हा शेअर 39 टक्क्यांनी आणि एका आठवड्यात 10 टक्क्यांनी वाढला आहे.

हिंदुजा समूहाचा इंडसइंड बँकेत 14.7 टक्के हिस्सा आहे. हिंदुजा ग्रुपचे चेअरमन अशोक हिंदुजा म्हणाले की, कोटक महिंद्र बँकेच्या उदय कोटकच्या यांच्यासारखेच बँकेत 26 टक्के भागभांडवल ठेवण्याचा अधिकार आम्हाला मिळायला पाहिजे, अशी मागणी त्यांनी आरबीआयकडे कली. मात्र वास्तविक पाहता कोटककडे केवळ 15 टक्के मताधिकार आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here