फ्लॉवर गड्डा १ तर मेथी, कोथिंबीर २ रुपये जुडी; ‘या’ ठिकाणी भाजीपाला मातीमोल, शेतकऱ्यांची दयनीय अवस्था

पुणे :

घाऊक बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली असून, दरात मोठी घसरण झाली आहे. शेवगा वगळता सर्वच फळभाज्या व पालेभाज्या अक्षरशः मातीमोल झाल्या आहेत. जीवनावश्यक असलेला भाजीपाला मार्केटमध्ये विक्रीला आला. भाजी खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांनी आणि जनसामान्यांनी गर्दी केली. मात्र यामुळे लाखोंचा भाजीपाला विक्रीअभावी मातीमोल झाला.

फ्लॉवरचा एक गड्डा चक्क १ रुपयांना घाऊक बाजारात विक्री होत आहे.  मेथी, कोथिंबीर यांसारख्या पालेभाज्या घाऊक बाजारात १ ते २ रुपये जुडी या दराने  मिळत आहेत. दरम्यान घाऊक बाजारात भाजीपाला मातीमोल झाला असला तरी किरकोळ बाजारात विक्रेते चढ्या दराने भाज्यांच्या विक्री करीत आहेत. चाकण मार्केट मध्ये १ रुपयाला मिळणारा फ्लॉवर किरकोळ बाजारात चक्क १० रुपयांना विक्री केला जात आहे. यामुळे ज्या व्यावसायिकांनी भाजी खरेदी केली, त्यांची मोठी पंचाईत झाली. या पडसाद काल पहायला मिळाले. 

भाजीपाला विक्रीकरिता मार्केटमध्ये पोहचला होता. या वाहनांनी बाजारपेठ भरली होती. मोठ्या प्रमाणात भाजीपाला आल्याने भाजीपाल्याचे दर घसरले होते. या स्थितीत भाजीपाला खरेदी करणारे ठोक आणि चिल्लर विक्रेतेही. यामुळे शेतकऱ्याचा शेतमाल जसाच तसाच पडून राहिला. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये सध्या मेथी, कोथिंबीर, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, वांगी, भेंडी, दोडका, दुधीभोपळा, काकडी, फरशी, ढोबळी मिरची, वाटाणा यांची आवक प्रचंड वाढली आहे.

आता शेतीला लावलेला पैसाही निघणार नाही. मजुरीलाही पैसे नाही, अशी व्यथा शेतकऱ्यांच्या झाली आहे. भाजीपाला उत्पादनाला मोठा खर्च आला. पण माल विकला गेला नाही. शेतकऱ्यांना खर्चालाही भाजी परवडला नाही. अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून येत आहेत.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here