म्हणून सलग चौथ्या दिवशीही झाली इंधन दरात वाढ; वाचा, काय आहेत आजचे दर

मुंबई :

कोरोनामुळे जगभरात आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे. शेअर मार्केट, सोने, इंधनांचे दर कधी कमी तर कधी जास्त होत आहेत. एकूणच काय तर आर्थिक परिस्थितीचा अंदाज बांधणे कठीण होऊन बसले आहे. अशातच सर्वसामान्यांना खिशाला झटका देणारी बातमी समोर आली आहे. आज सोमवारी सलग चौथ्या दिवशी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली. आज पेट्रोल ७ पैसे तर डिझेल १८ पैशांनी वधारले.

गेल्या दीड महिन्यापासून पेट्रोल डीझेलचे दर स्थिर होते. वातावरण पुन्हा नॉर्मल होईल, अशी चिन्हे दिसत होती. अशातच अनेक देशांनी लॉकडाउनचे संकेत दिल्याने इंधन मागणीत मोठी घट होण्याची भिती अनेक देशांनी वर्तवली आहे. त्यामुळे उत्पादन कपात करण्यात येत आहे. पुरवठा मर्यादित राहिल्याने मागील आठवडाभर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनीवरील दबाव वाढला आहे.

आता हा दबाव किती दिवस राहणार, हे पाहणे महत्वाचे आहे. कारण यापूर्वी जेव्हा लॉकडाउन लागले होते. तेव्हाच्या काळात सातत्याने जवळपास ३० दिवस पेट्रोल-डीझेलच्या किमतीत वाढ होत होती. आज मुंबईत पेट्रोलचा भाव प्रती लीटर ८८.२३ रुपये आणि डिझेल ७७.७३ रुपये झाला आहे.दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.५३ रुपये असून डिझेल ७१.२५ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.५३ रुपये असून डिझेल ७६.७२ रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल ८३.१० रुपये आहे. डिझेलचा भाव ७४.४८२रुपये प्रती लीटर झाले आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here