म्हणून भडकली IMA; पहा डॉक्टरांच्या संघटनेने कशाला म्हटलेय चोर दरवाजा

भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषद अर्थात सेन्ट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिकल यांनी आयुर्वेदिक डॉक्टरांना काही प्रकारच्या सर्जरी करता येतील असे नोटिफिकेशन काढले आहे. त्याला आक्षेप घेऊन इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

ट्विटरवर आपल्या नाराजीच्या मुद्द्यांचे पत्र IMA ने प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हटले आहे की, IMA ने वैद्यकीय उपचारासाठी एक लक्ष्मणरेषा आखलेली आहे. या नव्या निर्देशानुसार यास तडा जाईल. त्यामुळे neet परीक्षेतून होणारी प्रवेश प्रक्रिया निरर्थक ठरेल. त्यामुळे सेन्ट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिकल यांनी हे दिशानिर्देश पुन्हा मागे घेण्याची गरज आहे.

सेन्ट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिकल यांनी नवे दिशानिर्देश देताना म्हटले आहे की, आयुर्वेदिक डॉक्टर मागील 25 वर्षांपासून सर्जरी (ऑपरेशन) करीत आहेत. यामुळे त्यांना या नव्या निर्देशाद्वारे जनरल-ऑर्थोपेडिक सर्जरी डोळे, नाक, कान आणि गळा यांचे ऑपरेशन करता येणार आहे.

यामुळे आता डॉक्टरांच्या ऑपरेशन करण्याच्या अधिकार आणि शिक्षणाच्या मुद्द्यावरून देशात नवीन चर्चा सुरू झालेली आहे. यामध्ये कोणाला कोणता अधिकार देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण, या नव्या नोटिफिकेशनद्वारे पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशात चोर दरवाजाने प्रवेश देण्याची सोय झाल्याचे IMA ने म्हटले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here