धक्कादायक : ‘त्या’ 9 वी पास मेजरने फसवल्या 17 पोरी; 6.61 कोटी रुपयेही कमावले त्यातून..!

समाज कितीही आधुनिक होवो किंवा त्यातील अनेकांनी कितीही जास्त शिक्षण घेऊ देत फसवणारे कोणतेही शिक्षण न घेता या सगळ्यांच्या पुढचे असतात. याच नियमाला पुन्हा एकदा हैदराबाद येथे खऱ्या अर्थाने उजाळा मिळाला आहे. कारण, फ़क़्त नववी पास असलेल्या आणि तरीही बनावट मिलिटरी ओळखपत्र वापरून एका महाभागाने तब्बल 17 पोरींना फसवून लग्न केले आहे. वरती त्यांच्याकडून तब्बल 6.61 कोटी रुपयेही कमावले आहेत.

एखाद्या मस्त चित्रपटाला साजेशी अशीच ही स्टोरी आहे. पोलिसांनी या बोगस मिलिटरी अधिकाऱ्याला अर्थात मेजर साहेब यांना पकडले आहे. त्यांचे नाव आहे मधुवथ श्रीनु नायक उर्फ श्रीनिवास चौहान. हा महाभाग आहे आंध्रप्रदेश येथील प्रकाशम जिल्ह्यातील केल्‍लमपल्‍ली गावाचा. पोलिसांनी त्याच्याकडून बनावट 2 पिस्तुल, लष्करी पोशाख, बनावट ओळखपत्र आणि बोगस डिग्री सर्टिफिकेट हस्तगत केले आहेत.

याने फसवलेल्या 17 महिलांमध्ये अनेकजणी शिकलेल्या आहेत किंवा त्यांच्या कुटुंबातील अनेकजण उच्चशिक्षित आहेत. तरीही आपल्या स्टाईल आणि पैशांच्या जोरावर त्याने 17 जणींना फसवून लग्न करण्याची करामत केली आहे.

पोलिसांनी तपास केल्यावर असे आढळले आहे की, आरोपी श्रीनिवास चौहान याच्या कुटुंबीयांनाही तो लष्करी अधिकारी असल्याचे सत्य वाटत आहे. घरच्यांसह सर्वांना त्याने फसवून हा मोठा कारनामा केला आहे. त्याच्याकडून पोलिसांनी अलिशान घरातून अशा 3 लक्झरी कार आणि इतरही महागडे समान हस्तगत केले आहे.

एकूणच कोणी कितीही शिकलेला असो भारतीयांमध्ये फसवणूक होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे फसवणारे कितीही अशिक्षित आणि बोगस पदवी घेतलेले असोत त्यांना फसवणे सहजशक्य आहे. अगदी असे चोर शिक्षण, सामाजिक, राजकीय आणि सर्वच क्षेत्रात उच्चशिक्षित मंडळींना फसवत आहेत. आणि ही शिकलेली जनता त्यांच्या भूलथापांना फसून आनंदात जगत आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here