म्हणून रोहित पवारांनी केले मोदींचे कौतुक; तर, फडणवीसांवर केली ‘ही’ टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सौर ऊर्जा, इथेनॉल यासारख्या क्षेत्रांत केलेल्या कामाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कौतुक करतानाच कोरोनावरुन राज्य सरकारवर टीका करणाऱ्या राज्यातील भाजपा नेत्यांवरही निशाणा साधला आहे.

त्यांनी म्हटले आहे की, गेल्या काही वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशाने सौर ऊर्जा, इथेनॉल यासारख्या क्षेत्रांमध्ये केलेले काम हे निश्चितच उल्लेखनीय आहे. याबाबत केंद्र सरकारचे कौतुक करायलाच हवे. देशातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठीही असेच काम होईल, असा विश्वास आहे.

कोरोना हे दुसऱ्या महायुद्धानंतरचे जगापुढचे सर्वात मोठे आव्हान असून याविरोधात निर्णायक कृती करण्याचं आवाहन मोदीजींनी जी 20 परिषदेत जागतिक नेत्यांना केल्याने आनंद वाटला. त्यांनी या संकटाची जाणीव भाजपाच्या राज्यातील नेत्यांनाही करुन दिली तर ते या संकटाचा राजकीय खेळ थांबवतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here