मोदींमुळे वाढली देशातील बेरोजगारी; पहा नेमके काय म्हटलेय अजितदादांनी

सध्या भारतात आर्थिकदृष्ट्या खूप वाईट परिस्थिती असून बेरोजगारीचा दर उच्चांकी टप्प्यावर आहे. अशावेळी पंतप्रधान फ़क़्त मन की बात करून लक्ष इतरत्र वळवत असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.  

पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना अजितदादांनी भाजपवर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले की, ‘मन की बात’ या कार्यक्रमामधून अनेक गोष्टी सांगितल्या जातात. अनेक अश्‍वासने दिली जातात; मात्र प्रत्यक्षात काहीच होत नाही. करोनानंतरच्या काळात केंद्र सरकारने घेतलेल्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्रासह देशात प्रचंड बेरोजगारी वाढली आहे. केंद्राच्या कामगार कायद्यामुळे कामगारांवरही अन्याय झाला आहे.

20 लाख कोटींच्या पॅकेजचा बोलबाला करण्यात आला. मात्र कोणाला फायदा झाला हे कळलेच नाही. यावर राष्ट्रवादीच्या खासदारांनी लोकसभेतही अनेकवेळा मुद्दे उपस्थित केले. मात्र त्याचे उत्तर मिळाले नाही, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

 संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here