शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज; दिवसा विजेसाठी केली जाणार ‘ही’ कार्यवाही

नुकत्याच एका कुटुंबातील तिघांचा रात्रपाळीच्या शेतात पाणी देताना दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे महावितरण कंपनी आणि शेतीला रात्री वीज देण्याच्या धोरणावर ग्रामीण भागात तीव्र असंतोष आहे. त्याचीच दखल घेऊन आता दिवसा वीज देण्यासाठी खास कार्यवाहीची तयारी महाविकास आघाडी सरकारने केली आहे.

ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत यांनी म्हटले आहे की, शेतकऱ्यांना तत्काळ वीजकनेक्शन देण्याचा धोरणात्मक निर्णय झाला आहे. शेतीपंपांच्या थकबाकीतून वसूल होणाऱ्या रकमेतील 66 टक्के रक्कम महावितरणच्या पायाभूत सुविधांसाठी वापरली जाईल. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी राज्यामध्ये सौरऊर्जेवरील 68 फीडर उभारण्यात येणार असून, अनेक भागांमध्ये दिवसा वीज देण्यास सुरुवातही केली आहे.

योग्य दाबाने वीजपुरवठा होण्यासाठी सुविधा द्याव्या लागतात. याचा अगोदरच्या सरकारने कधी विचार केला नाही. गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात शेतकऱयांना दिलासा दिला नाही. दिवसा वीज का देऊ शकले नाही, आम्ही याचा सारासार विचार करून नवीन धोरण अवलंबत आहोत. ग्रामीण भागामध्ये डीपी हा कळीचा मुद्दा आहे. तो कायमस्वरूपी सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही तनपुरे यांनी म्हटले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here