अहमदनगर जिल्हा बँकेत कर्जवाटप घोटाळा; राजकीयदृष्ट्या कर्जवाटप केल्याचा संशय

आशियातील सर्वात मोठी सहकारी बँक असे बिरूद मिरवणाऱ्या अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत कर्जवाटप घोटाळा झाला आहे. 144 कोटी रुपये इतक्या मोठ्या रकमेचे कर्जवाटप करताना राजकीयदृष्ट्या हस्तक्षेप झाल्याची चारच आहे. तसेच बँकेचे संचालक दय शेळके यांनीही यामध्ये मोठ्या प्रमाणात अनागोंदी झाल्याचा आरोप केला आहे.

शेळके यांनी लोकमत वृत्तपत्राला माहिती देताना म्हटले आहे की, गायी नसताना कर्ज वाटप केले जात असल्याच्या तक्रारी आहेत. असे असेल तर हे नियमबाह्य कर्ज ठरेल. यामुळे खरे गरजवंत शेतकरी वंचित तर राहतीलच; पण हे कर्ज बुडाल्यास त्याचा परिणाम थेट सामान्य नागरिकांच्या ठेवींवर होईल. त्यामुळे या सर्व कर्जवाटपाची चौकशी व्हावी ही आपली भूमिका असून, यासंदर्भात आपण सोमवारी बँकेला लेखी पत्र देणार आहोत.

मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी या प्रकरणांची चौकशी केली जाणार असल्याचे म्हटले आहे. नगर व श्रीगोंदा तालुक्यासह अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना कर्ज देताना मोठे कार्यक्रम घेण्याचा धडाका काही संचालकांनी लावला आहे. कर्ज हे अनुदान नसून, ते शेतकऱ्यांना पुन्हा भरावे लागणार आहे. असे असतानाही या कर्ज वाटपाचे फोटो सेशन करून काही संचालक राजकीय फायदा उचलत आहेत. या कर्ज वितरणावरून बँकेत तीव्र मतभेद दिसत आहेत. प्रशासन काही संचालकांच्या दबावातून नियमांकडे दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here