म्हणून वाढलेत सर्दी-खोकल्याचे रुग्ण आणि भीतीही; ‘ही’ घ्या महत्वाची काळजी

वातावरणातील बदलामुळे सध्या सर्दी-खोकला आणि तापीचे रुग्ण वाढत आहेत. हेच करोना विषाणूची लग्न झाल्यावर होणाऱ्या कोविड 19 आजाराचे लक्षण असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणही वाढत आहे.

सध्या महाराष्ट्रभर किमान 70 टक्के नागरिकांना सर्दी-खोकला ही लक्षणे आहेत. दिवसभर ऊन आणि रात्री थंडी असे विषम असा वातावरणात झालेला हा बदल सर्दी-खोकल्याला निमंत्रण देणारा ठरला आहे. त्यामुळे सध्या मोठ्यांपेक्षा लहान मुलांनाच जास्त सर्दी, खोकला सुरू असल्याचे दिसून आले आहे.

हवेतील प्रदूषण, फटाक्यांमुळे झालेले प्रदूषण, वातावरणात अचानक झालेला बदल, दिवसभर ऊन आणि रात्री थंडी अशा वातावरणातील बदलामुळे सर्दी-खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढत असल्याचे वैद्यकीय तज्ञांचे म्हणणे आहे. सर्दी, खोकला होताच नागरिकांनी तात्काळ उपचार करावेत. धूर, धूळ, गोड पदार्थामुळे सर्दीत वाढ होते. दूषित पाण्यामुळे काही ठिकाणी जुलाबाचेही रुग्ण आढळून येतात. त्यामुळे आहाराचे योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे.

सर्वांनी मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्स ठेवणे आवश्यक आहे. लहान मुलांची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. मुलांची व मोठ्यांनीही प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.

ढगाळ हवामानामुळे अस्थमा, दम्याचेही रुग्ण वाढले आहेत. उष्ण पदार्थ खाणे, सकस आहार घेणे, मोड आलेली कडधान्ये खाणे, बेकरीचे पदार्थ, जंकफूड खाणे टाळणे, नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. वातावरणात बदल झाला तरी त्याचा परिणाम होणार नाही.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here