म्हणून महाविकास आघाडीच्या बैठकीत पेटली वादाची ठिणगी; पहा कोणत्या मुद्द्यावर आक्रमक झाले शिंदे समर्थक

महाविकास आघाडी विरुध्द भाजप अशा पद्धतीने सध्या राज्यभरात निवडणुका लढवल्या जात आहेत. अशावेळी मानापमान नाट्य घडल्याने पुन्हा एकदा आघाडीला मोठा झटका बसला आहे. सोलापूर येथील कार्यक्रमात हा प्रकार घडला असे तरुण भारत दैनिकाने आपल्या बातमीत म्हटले आहे.

त्यांनी बातमीत पुढे म्हटले आहे की, बॅनरवर सुशीलकुमार शिंदे यांचा फोटो नसल्याने शिंदे समर्थकांनी गोंधळ घटला. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसमधील नाराजी नाट्य उघडकीस झाले आहे. त्यामुळे काही काळ तणवाचे वातावरण निर्माण झाले होते. ‘सुशिलकुमार शिंदे आगे बढो’ असे नारे दिले. दरम्यान, या घोषणांमुळे बैठकीत पुरता गोंधळ उडाला. मंत्री सतेज पाटील यांनी वारंवार आवाहन करुनही काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाद न दिल्यामुळे बैठकीतील गोंधळ वाढतच गेला.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार जाणीवपूर्वक केल्याचा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ महाविकास आघडीची बैठक आज सोलापुरात पार पडली. महाविकास आघाडीच्या या बैठकीत सुशीलकुमार शिंदे समर्थक आक्रमक झालेले पाहायला मिळाले, असेही तरुण भारतच्या बातमीत म्हटलेले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here