चीनला दिली अशी जोरदार मात; वाचा ‘टनल डिफेंस’मध्ये भारत कसा शेजाऱ्यांना देतोय धक्का

भारतीय सैन्याने कुरापतखोर शेजारी असलेल्या चीनला वेळोवेळी अनेक धक्के दिले आहेत. मात्र, आता दुसऱ्या महायुद्धात चीनने ज्या ‘टनल डिफेंस’द्वारे जपानी सैन्याला जेरीस आणले होते तेच तंत्र भारतीय सैन्याने वापरून चीनवर जोरदार मात केली आहे.

हिंदुस्थान टाईम्स या आघाडीच्या वृत्तपत्राने याची महत्वाची बातमी प्रसिद्ध केली आहे. त्यात म्हटले आहे की, चीनच्या पीपल्स रिपब्लिक आर्मीने ल्हासा एयरबेस आणि हैनान बेटांवर जमिनीच्या आत तयारी केलेली आहे. न्यूक्लियर बैलिस्टिक पाणबुड्या ठेवण्यासाठी दक्षिण चीनी समुद्रात अशीच तयारी चिन्यांनी केली आहे. त्यालाच आता भारताने आव्हान दिले आहे.

भारतीय सैन्याने Hume reinforced concrete pipes यांच्या 6 ते 8 फुट व्यासाच्या पाईपमध्ये जमिनीत ‘टनल डिफेंस’ सिस्टीम उभारली आहे. गलावान घाटी आणि एकूण लडाखमधील प्रदेशासह चीन सीमेवर अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आलेले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here