किरीट सोमय्यांना ट्विटरवर मिळाला ‘हा’ प्रतिसाद; पहा कोणी काय दिलेय उत्तर

लव्ह जिहाद हा नसलेला मुद्दा भारतीय राजकारणात पुढे आणण्यात भाजपला यश आलेले आहे. अनेक समस्यांमध्ये देश अडकत चाललेला असताना आणि आर्थिक आघाडीवर देशात काहीही चांगले होत नसताना हा मुद्दा जोमात आहे. यावरून आता भाजप आणि शिवसेना या हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या राजकीय पक्षांमध्ये लढाई सुरू झालेली आहे.

यावरून भाकप नेते किरीट सोमय्या यांनी सेनेवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “शिवसेना चा बदलता रंग”. 10 सप्टेंबर 2014 चा अंकात “सामना” वर्तमानपत्र संपादक श्री उध्दव ठाकरे लिहितात “लव्ह जिहाद” समाजासाठी घातक. योगी आदित्यनाथ ना पाठिंबा… 21 नोव्हेंबर 2020 शिवसेना, सामना, महापौर सांगतात “लव्ह जिहाद” मधे गैर काहीच नाही. त्यावर अनेकांनी आपापले मत आणि प्रत्युत्तर लिहिले आहे.

शैलेंद्र पाटणकर यांनी म्हटले आहे की, किरीट जी ,महाराष्ट्रात आता अशी परिस्थिती आहे की शिवसेनाने हिंदुत्व सोडले आहे, त्याची व कॅागरेस ची सोशिकता संपली आहे, ते सगळे दादागिरी, गुंडागरदी वर उतरले आहेत. महाराष्ट्र व विशेषता मुंबई मधे जनता सुरक्षीत नाही.हे तालीबानी सरकार आहे.संविधानाची धजजीया पोलीस कमिशनर स्वःता उडवत आहेत.

तर, पराग मोहिते लिहितात की, ‘बदलत्या रंग’ बद्दल किरिट सोमैय्या ने बोलण म्हणजे सरड्याने रंग “न” बदलण्याचे फायदे सांगणे. यासह श्रेयस गांधी यांनी म्हटलेय की, महाराष्ट्रातलं सरकार स्वत:च लव्ह जिहादच शिकार झालय, ते काय लव्ह जिहाद चा कायदा बनवणार आहे..

स्वप्नील गोरे यांनी लिहिलेय की, अरे सोमैया जरा देशातल्या परिस्थिती वर बोल. तुमच हिंदुत्व जर एवढे पक्के होते तर मग ज्यांनी बाबरी पाडली तेव्हा जे कर सेवक होते त्यांची जबाबदारी का नाही घेतली. त्यांची जबाबदारी फक्त बाळा साहेबांनी घेतली होती.

संपादन : सचिन मोहन चोभे  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here