सेनेच्या भगव्यावर केली किरीट सोमय्यांनी ‘ही’ टीका; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी

भाजप नेते किरीट सोमय्या म्हणजे शिवसेना या पक्षाला अडचणीत आणणारे नेते. आताही त्यांनी सामना या मुखपत्रातून लव्ह जिहाद यावर प्रसिद्ध झालेल्या मतांबद्दल सेनेवर टीका केली आहे.

त्यांनी म्हटले आहे की, “शिवसेना चा बदलता रंग”. 10 सप्टेंबर 2014 चा अंकात “सामना” वर्तमानपत्र संपादक श्री उध्दव ठाकरे लिहितात “लव्ह जिहाद” समाजासाठी घातक. योगी आदित्यनाथ ना पाठिंबा… 21 नोव्हेंबर 2020 शिवसेना, सामना, महापौर सांगतात “लव्ह जिहाद” मधे गैर काहीच नाही’

सेनेने ‘लव्ह जिहाद हा भाजपचा अजेंडा आहे. अखेर लग्न करत असताना मुलगा आणि मुलीची संमती महत्त्वाची असते. मात्र, भाजप यावरुन फक्तर राजकारण करत आहे,’ अशी झोंबणारी टीका भाजपवर केली होती. त्याला सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

संपादन : सचिन पाटील  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here