अशी तयार करा कोंबड्यांना तुसाची गादी; वाचा काय आहे याचे नामके शास्त्र

पोल्ट्री अर्थात कुक्कुटपालन हा व्यवसाय आता जुन्या काळाप्रमाणे परंपरागत न राहता त्यात नवीन तंत्रज्ञान आलेले आहे. अशावेळी आपण पिल्ले आणणे, त्यांची काळजी घेणे याबाबत अगोदरच माहिती घेतली आहे. आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत की, तूस कसे पसरावे, त्याची गादी (लीटर) कशी करावी आणि त्यामुळे होणारे फायदे नेमके काय आहेत ते.

तर, वाचक मित्र-मैत्रिणींनो, कुक्कुटपालन करताना तूस हे खूप आवश्यक आहे. तुसाच्या गादीसाठी वापरण्यात येणारे साहित्य सहज उपलब्ध होणारे स्वस्त, ताजे स्वच्छ,कोरडे व ते कुजणारे असावे. अशा गादीमध्ये विष्टेतील ओलावा शोषून घेण्याची क्षमता असावी. लाकडाचा भुसा  व तांदळाची तूस यासाठीच वापरली जाते. मात्र, भुसा मिळणे तितके सहजशक्य नाही. त्यामुळे सगळीकडे शक्यतो तूस वापरले जाते. 

ऋतूनुसार गादीची उंची कमी जास्त ठेवावी लागते. उन्हाळ्यात तुसाच्या गादीची उंची कमी चालते. परंतु, हिवाळ्यामध्ये १.५-२  इंच असावी. थंडी जास्त वाढल्यास या गादीमुळे पक्षांना उब मिळते. दिवसातून किमान दोनवेळा ही गादी हलवावी. यामुळे विष्ठेचा वास येत नाही व त्याची लवकर पावडर तयार होते. हे कोरडे राहण्यासाठी १०० चौरस फूटसाठी एक किलो चुन्याचा वापर करावा. शेडमधील लीटर अर्थात गादी कायम कोरडी राहील याकडे लक्ष द्यावे. अशावेळी भिजलेले तूस त्वरित काढून टाकावे अन्यथा ते कुजून वास येतो. त्यामुळे रोगराईला निमंत्रण मिळू शकते. शेडमधील पक्षी विकल्यानंतर गादी काढून कंपोस्ट खड्यात टाकावे.

संपादन व लेखन : माधुरी सचिन चोभे

(क्रमशः)

वाचक बंधू-भगिनींनो, आपण ‘कृषीरंग’वर दररोज कुक्कुटपालन अर्थात पोल्ट्री फार्मिंग (Poultry Farming) या विषयावरील माहितीची मालिका प्रसिद्ध करणार आहोत. यामध्ये महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीसह जगभरातील पोल्ट्री फार्मिंग ट्रेंड आणि संशोधन याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. सध्या या व्यवसायाला ‘अच्छे दिन’ आल्याच्या बातम्या माध्यमांतून येतात. अशावेळी या व्यवसायाचे वास्तव आणि व्यावहारिक भान देण्याचा हा प्रयत्न आहे. आपणास कोणत्याही सूचना व मार्गदर्शन करावेसे वाटल्यास krushirang@gmail.com या इमेलद्वारे आपण आम्हाला संपर्क करू शकता. तसेच नियमित बातम्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय न्यूज अपडेट आणि कृषी-ग्रामीण विकासाची माहिती पाहण्यासाठी आमचे www.facebook.com/Krushirang (कृषीरंग) हे फेसबुक पेज लाईक व फॉलो करा. ही माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना माहितीसाठी शेअर करा. @टीम कृषीरंग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here