म्हणून सुरू आहे बॉयकॉट नेटफ्लिक्स ट्रेंड; पहा कोणत्या व्हिडिओमुळे दुखावल्यात धार्मिक भावना

मंदिरात एका मुस्लीम हिरो पात्राने हिंदू हिरोईनचा कीस घेतल्याच्या सीन मुळे धार्मिक भावना दुखावल्याचे कारण देत ट्विटरवर सध्या बॉयकॉट नेटफ्लिक्स ट्रेंड चालू झालेला आहे.

अनेकांनी आमच्या धार्मिक भावना यामुळे दुखावल्या असल्याचे सांगत हा ट्रेंड सेट केला आहे. अनेक हिंदुत्ववादी मंडळी आणि संघटनांनी हा ट्रेंड मोठा करण्याचे आवाहन करून याला हवा दिली आहे. तर, देशभक्त बनर्जी यांनीही एक पौराणिक शिल्प असलेला फोटो शेअर करून आपला यास कसा पाठींबा आहे हे स्पष्ट केले आहे.

अनेकांनी यानिमित्ताने मशिदीत असा सीन घेण्याचे आव्हान दिले आहे. तर काहींनी मंदिरात आणि आश्रमात अनैतिक प्रकार चालतात, अगदी अनेकदा महिलांवर शारीरिक अत्याचार केले जातात. तसेच अनेक पौराणिक हिंदू मंदिरांमध्ये प्रणय आराधना याचे चुंबन शिल्प असल्याकडे लक्ष वेधून याला पाठींबा न देण्याचे सूचित केले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here