असे आहे करोनाचे चित्र; ‘तिथे’ सर्वाधिक रुग्णवाढ आणि मृत्यूही वाढले

देशभरात करोना विषाणूचा कहर काहीकेल्या कमी होण्याची चिन्हे नाहीत. एकूण सार्वजनिक आरोग्याची दुरवस्था झालेली असल्याने कोविडची दुसरी लाट भारतात आलेली आहे. त्यामध्ये सर्वाधिक रुग्णवाढ महाराष्ट्र राज्यात होत आहे.

महाराष्ट्रात ५७६० आणि राजस्थानमध्ये ३००७ नवे रुग्ण आढळले. रुग्णसंख्या वाढीत ही दिवसभरातील सर्वाधिक संख्या आहे. त्यामुळे हे दोन्ही राज्ये गंभीर संकटाच्या टप्प्यावर आहेत. तर, छत्तीसगडमध्ये या महिन्यातील २१ दिवसांत २९७ बळी गेले आहेत. त्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात कमी म्हणजे ११६ मृत्यू झाले होते.

भारतात कोरोना चाचण्यांच्या संख्येने १३ कोटींचा टप्पा पार केला आहे. चाचण्यांमध्ये भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत सर्वाधिक १७.७ कोटींपेक्षा अधिक चाचण्या झाल्या आहेत. भारतात कोरोना रुग्णांची संख्या ९१ लाखांजवळ पोहोचली आहे. तथापि, बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या (४४,९८०) नव्या रुग्णांच्या तुलनेत (४४,४९८) अधिक आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here