दवाखान्यांतून लुट मान्य करतानाच केली ‘ही’ शिफारस; पहा काय म्हटलेय संसदीय समितीने

करोना कालावधीत अवघ्या देशातील अर्थव्यवस्था आणि सामाजिक जनजीवन ठप्प असतानाच काहींनी आपली चांदी करून घेतली आहे. अशावेळी आरोग्य प्रकरणांच्या स्थायी संसदीय समितीने अहवाल देताना डॉक्टरांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करतानाच डॉक्टरांना शहिदांचा दर्जा देण्याचीही शिफारस केली आहे.

समितीने म्हटले आहे की, देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच चालला आहे. सरकारी रुग्णालयांत बेडही शिल्लक नाहीत. कोरोनाच्या उपचारासाठी विशिष्ट दिशानिर्देश नाहीत. परिणामी खासगी रुग्णालयांनी कोरोनाची तपासणी व उपचारांच्या नावाखाली अक्षरश: लूटमार सुरू केली आहे. ते मनमानी शुल्क वसूल करत आहेत.

या समितीचे अध्यक्ष समाजवादी पार्टीचे नेते रामगोपाल यादव हे आहेत. समितीने आपला हा अहवाल राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे सोपवला आहे. त्यात म्हटले आहे की, दरांचे विशिष्ट सक्षम मॉडेल असते तर अनेक कोरोनाग्रस्तांचे जीव वाचले असते.

भारतात कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून प्रथमच अधिकृत व्यासपीठावरून या समितीच्या निमित्ताने व्यवस्थेवर इतक्या कठोर शब्दांत ताशेरे ओढण्यात आले आहेत.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here