अदानी सुसाट; बिल गेट्स यांना यशस्वी आव्हान; बेजोस, मस्क आणि अंबानींनाही देतायेत टस्सल

सध्या जगभरात दोन भारतीय उद्योगपतींचे नाव मोठ्या आदराने आणि कौतुकाने घेतले जात आहे. कारण, एकीकडे भारताची अर्थव्यवस्था संकटात असतानाच त्या दोन्ही उद्योगपतींनी आपल्या ग्रोथने थेट मोठी उचल खाल्ली आहे. अदानी यांनी तर थेट बिल गेट्स यांना पाठीमागे टाकून बेजोस, मस्क आणि अंबानींनाही टस्सल देण्याची तयारी केली आहे.

होय, गुजराती उद्योगपती असलेल्या गौतम अदानी यांनी यंदा जगभरात संपत्ती वाढीमध्ये नवव्या स्थानावर उडी घेतली आहे. याबाबतीत त्यांनी भारतातील सर्वाधिक श्रीमंत असलेल्या आपले मित्र मुकेश अंबानी यांनाही पाठीमागे टाकले आहे. इतकेच नाही, तर जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत असलेल्या बिल गेट्स, लॅरी पेज व स्टीव्ह बाल्मर यांनाही पाठीमागे टाकले आहे.

वार्षिक संपत्ती वाढीच्या यादीत अॅमेझॉनचे जेफ बेजोस १३.६१ लाख कोटी रु. (१८४ अब्ज डॉलर) संपत्तीसह पहिल्या स्थानी आहेत. तर, टेस्ला कंपनीच्या अॅलन मस्क यांची संपत्ती ७.०३ लाख कोटी रुपये इतकी (९५ अब्ज डॉलर) वाढून ती ९.१० लाख कोटी झाली आहे. १९८८ मध्ये वयाच्या ३२ व्या वर्षी कमोडिटी ट्रेडरच्या रूपात कारकीर्द सुरू केलेल्या अदानी यांनी या यशाने सर्वांचे लक्ष पुन्हा एकदा वेधले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here