अदानी-अंबानींमध्ये खरी टस्सल; पहा दोघांपैकी कोण आहे कशामध्ये आघाडीवर

भारतातील सर्वाधिक श्रीमंत म्हणून आपले स्थान पक्के करतानाच अवघ्या जगातील नंबर एकचे श्रीमंत होण्याची तयारी सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश यांनी केली आहे. तर, त्यांना पाठीमागून येऊन टस्सल देण्यासाठी सज्ज झाले आहेत गौतम अदानी.

2015 नंतर या दोन्ही उद्योगपतींनी केलेली ग्रोथ अवघ्या जगाला आश्चर्याचा धक्का देणारी आहे. कारण, अनेक मोठी कंत्राटे मिळवण्यासह विविध क्षेत्रात नव्याने पाय पसरून बस्तान बसविण्यात या दोघांनी यश मिळवले आहे. अशावेळी अंबानींना मागे टाकून अदानी यांनी मोठी ग्रोथ पकडली आहे. त्यामुळे आता हे दोघेजण नेमके कशात आघाडीवर आहेत, फरक काय आहेत आणि दोघांमध्ये नेमके काय साम्य आहे याचीही चर्चा सुरू झालेली आहे.

साम्य, फरक आणि व्यावसायिक मुद्दे असे :

संपत्तीबाबतीत विचार केल्यास अंबानी १० व्या तर, अदानी ४० व्या स्थानी आहेत. या दोघांमध्ये एक धागा सेम आहे तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मैत्री.

मात्र, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी या वर्षी श्रीमंत भारतीयांत सर्वाधिक उत्पन्न वाढ करण्यात यशस्वी ठरले. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनाही त्यांनी मागे टाकले आहे.

ब्लूमबर्ग बिलियनेयर इंडेक्सनुसार, यंदा साडेदहा महिन्यांत अदानींची संपत्ती १.४१ लाख कोटींनी वाढली. म्हणजे त्यांनी संपत्तीत रोज ४४९ कोटींची भर टाकली आहे.

अंबानी आतापर्यंत त्याच कालावधीत आपल्या संपत्तीत १.२१ लाख कोटी रुपयांचीच (१६.४ अब्ज डॉलर) भर टाकू शकले. म्हणजेच अंबानींनी संपत्तीत रोज सुमारे ३८५ कोटींची भर घातली आहे.

मबर्ग बिलियनेयर इंडेक्सच्या हिशेबाने संपत्तीत भर घालणाऱ्यांच्या यादीत अदानी जगात नवव्या क्रमांकावर आहेत. त्यांनी जगातील दुसऱ्या (बिल गेट्स), ७ व्या (लॅरी पेज) व ९ व्या (स्टीव्ह बाल्मर) यांनाही मागे टाकले.

अदानींनी १९८८ मध्ये वयाच्या ३२ व्या वर्षी कमोडिटी ट्रेडरच्या रूपात कारकीर्द सुरू केली होती.

अदानी ग्रीन एनर्जी, अदानी एंटरप्रायजेस, अदानी गॅस आणि अदानी ट्रान्समिशन. अदानी ग्रीनचे शेअर २०२० मध्ये १०४९% नी वाढले आहेत.

तर, अदानी गॅस आणि अदानी एंटरप्रायजेसच्या शेअरमध्ये १०३% आणि ८५% ची वाढ झाली आहे. ट्रान्समिशन आणि पोर्ट््स क्रमश: ३८% व ४% नी वाढले. मात्र, अदानी पॉवरमध्ये ३८ % ची घसरण झाली.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here