म्हणून शाळा सुरू करण्यास शिक्षक-पालकांचा आहे विरोध; पहा काय आहे राज्यातील चित्र

राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय सुरू करण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. मात्र, शिक्षकांच्या करोना टेस्ट अनेक ठिकाणी पॉझिटिव्ह येत असल्याने शिक्षक-पालकांनी धसका घेतला आहे. त्यामुळे शाळा उघडण्यास दोन्ही घटकांनी आपला विरोध असल्याचे म्हटले आहे.

धुळे जिल्ह्यात आतापर्यंत ४ हजार ०६४ शिक्षकांच्या तपासण्या झाल्या असून त्यात ५ शिक्षक पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाने दिली. शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक पातळीवर अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही.

जळगावात ५०० जणांच्या तपासण्या झाल्या आहेत. त्यात शिक्षकांचा पॉझिटिव्हिटी रेट साधारणत: दोन टक्के असल्याचे शासकीय रुग्णालय प्रशासनाने सांगितले. नागपुरात ४२ शिक्षक कोरोना बाधित निघाल्याने शाळा सुरू करण्यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. तर, सोलापूर जिल्ह्यात १४,२०५ शिक्षकांची तपासणी झाली असून त्यापैकी तब्बल १७८ शिक्षक बाधित आहेत.

२३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावी हे वर्ग सुरू करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतल्यानंतर चिंता व्यक्त होत आहे. कोविड 19 ची दुसरी लाट येण्याची भीती असून दिवाळीनंतर वाढते रुग्ण बघता या चिंतेत भरही पडली आहे. अशा परिस्थितीत घाईघाईत शाळा सुरू करू नये असे मत पालक, शिक्षक, डॉक्टर यासह विविध क्षेत्रांतून उमटत आहे. 

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here