साखर कारखान्यात स्फोट; दोघांचा मृत्यू, वायुगळतीने 6 कामगार अत्यवस्थ

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्याच्या अनगर येथील लोकनेते अॅग्रो इंडस्ट्रीमध्ये झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. गॅस टाकी फुटून हा अपघात झाला आहे. टाकी खाली कोसळल्याने नंतर वायुगळती झाली.

या दुर्घटनेत सहाजण जखमी झालेले आहेत. साखऱ कारखान्यामध्ये रात्री साडेबाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. सज्जन जोगदंड (वय 20), मंगेश पाचपुंड (वय 24), महेश बोडके (वय 20), कल्याण गुरव (वय 29), परमेश्वर थिटे (वय25), राजू गायकवाड (वय 20), रवींद्र काकडे (वय 20), संजय पाचे (वय 45) हे जखमी झाले. यामध्ये ज्योतिबा दादाराव वगरे (वय 45), सुरज अंकुष चव्हाण (वय 22) या दोघांचा मृत्यू झाला आहे.

शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास कारखान्याचे गाळप सुरू होते. दरम्यान अचानक मिथेन गॅसच्या टाकीत गॅस आणि लिक्वीडचे प्रमाण जास्त झाले. यामुळे टाकी खाली कोसळली. या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here