म्हणून औरंगाबाद-पुणे रोड 2 तास जाम; प्रवाशांवर संक्रात, पहा काय झाले होते नेवासा फाटा येथे

सध्या सगळेजण दिवाळी आणि करोनाच्या सुट्टीच्या संपण्याच्या मोसमाची मजा घेत आहेत. पोलीस दादाही त्याला अपवाद नाहीत. मात्र, त्यामुळे अनेकांच्या प्रवासावर संक्रात आलेली आहे. असाच प्रकार नेवासा फाटा येथे झाल्याचे लोकमत वृत्तपत्राने म्हटले आहे.

त्यांनी बातमीत म्हटले आहे की, वाहतुकीचे कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस वेळेवर हजर नसल्यामुळे येथील प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी ही वाहतूक कोंडी हटविण्याचा प्रयत्न केला. अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथे रविवार (दि.२२) रोजी सकाळी साडेअकरा वाजता वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती.

तब्बल दोन तास वाहतूक कोंडीने वाहनधारकांचा कर्णकर्कश हॉर्न, गाड्यांच्या आवाजाने व्यावसायिक हैराण झाले होते. मात्र वाहतूक जाम झाल्यावर एक ते दीड तासाने नेवासा फाटा येथे नेमणुकीस असलेले वाहतूक पोलीस आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. त्यामुळे प्रवासी, नागरिक व रस्त्यावरील व्यावसायिकांनी संताप व्यक्त केला आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here