‘सौ चुहे खाके’ चंद्रकात दादांनी 11 वर्षांत काय दिवे लावले; पहा कोणी केलीय ही जहरी टीका

सध्या पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा प्रचार जोमात आहे. हा मतदारसंघ म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांचा बालेकिल्ला. त्यांनीच 11 वर्षे प्रतिनिधित्व करताना या भागात काहीही काम केले नाही. तेच आता ‘सौ चुहे खाके बिल्ली हजको चली’ स्टाईलने राष्ट्रवादीवर टीका करीत असल्याचे राष्ट्रवादीचे पिंपरी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी म्हटले आहे.

वाघेरे यांनी म्हटले आहे की, पुणे पदवीधर मतदारसंघाचे तब्बल 11 वर्षे प्रतिनिधित्व करणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी या मतदारसंघातील पदवीधरांचा एकही प्रश्‍न सोडविला नाही. चंद्रकांत पाटलांमुळेच पुणे मतदारसंघातील पदवीधरांचे नुकसान झाले. राज्यात भाजपाचे सरकार असतानाही पदवीधरांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पाटलांना आता निवडणुकीमध्ये पदवीधरांची आठवण झाली आहे. खोट बोलण्यात माहीर असलेल्या चंद्रकांत पाटलांची महाविकास आघाडी सरकारवरील टीका म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली हजको चली’ असा प्रकार आहे.

11 वर्षांच्या काळातील अपयश लपविण्यासाठी ते महाविकास आघाडीवर टीका करत असून त्यांच्या टिकेला आता कोणीही गांभिर्याने घेत नाही. 1 डिसेंबर रोजी पदवीधर आपला रोष मतपेटीतून व्यक्त करतील आणि चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला जागा दाखवून देतील, असेही वाघेरे यांनी म्हटले आहे.

संपादन :सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here