ब्रेकिंग : कोल्हापूरच्या आणखी एका सुपुत्रास J&K मध्ये वीरमरण

पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्यात ऋषिकेश जोंधळे शहीद झाले होते. ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी मध्यरात्री कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील निगवे खालसा येथील संग्राम शिवाजी पाटील यांना वीरमरण आले. 

शहिद जवान हे संग्राम पाटील हा सैन्यदलातील ’16 मराठा बटालियन’मध्ये कार्यरत होते. संग्राम पाटील हे अठरा वर्षांपूर्वी सैन्यदलामध्ये भरती झाले होते. त्यांची 17 वर्षाची मुदत गेल्या वर्षी संपली होती. सतरा वर्षे देश सेवा केल्यानंतर आणखी दोन वर्षे त्याने मुदत वाढवून घेतली होती. मात्र शुक्रवारी पाकिस्तानच्या भाड हल्ल्यामध्ये त्यांना वीरमरण आले आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here