IAS आणि प्रेमातील टॉपर अखेर होतायेत विभक्त; टीना डाबी आणि अतहर कोर्टात..!

यूपीएससी परीक्षेतील टॉपर आणि प्रेमाविवाहामुळे अनेकांच्या आकर्षणाचा विषय ठरलेल्या टीना डाबी आणि अतहर अमीर यांच्यामध्ये सध्या बेबनाव आहे. त्यांनी विभक्त होण्यासाठी जयपूर (राजस्थान) येथील कौटुंबिक न्यायालयात यासाठी अर्ज दाखल केलेला आहे.

रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीने आपल्या न्यूज पोर्टलवर ही बातमी प्रसिद्ध केली आहे. त्यात म्हटले आहे की, सध्या दोघेही राजस्थान राज्यात प्रशासकीय सेवेमध्ये आहेत. मात्र, वर्षभरापासून त्यांच्यात विसंवाद आहे. टीना यांनी सोशल मिडीयामध्ये यावर वेळोवेळी पोस्ट शेअर केलेल्या आहेत.

2015 च्या यूपीएससी परीक्षेत टीना या प्रथम तर, दुसऱ्या स्थानावर अतहर यांनी यश मिळवले होते. नंतर दोघांमध्ये प्रेम झाले. मसुरी येथील ट्रेनिंग संस्थेत आणि नंतरही त्यांनी अनेक फोटो सोशल मीडियामध्ये शेअर केले होते. मात्र, आता या दोन्ही टॉपर प्रेमींमध्ये विभक्त होण्याचा निर्णय जवळपास झालेला आहे. त्यासाठी त्यांनी कोर्टाची पायरी चढली आहे.

संपादन : सचिन पाटील

रिपब्लिक भारत यांच्या बातमीची लिंक : https://bharat.republicworld.com/india-news/general-news/ias-topper-tina-dabi-husband-athar-aamir-filed-for-divorce-in-family-court

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here