भाकपने दणाणून सोडले ‘महावितरण’; ठिय्या आंदोलन आणि घोषणाबाजीने वेधले लक्ष

अहमदनगर :

रिडींग न घेता मनमानी पद्धतीने महावितरण कंपनी बिल देत असल्याची भावना राज्यभरात निर्माण झालेली आहे. हेच वीज बिल रद्द करण्यासह टाळेबंदी काळातील वीज बिले माफ व्हावी आणि शेतकर्‍यांची सरसकट वीज बिले माफ करून सर्वसामान्यांना वीज बिल वसुलीसाठी सक्ती करू नये, या मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने अहमदनगर येथील महावितरण कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

शनिवारी (दि.21 नोव्हेंबर) सकाळी झालेल्या आंदोलनाप्रसंगी महावितरण कार्यालयात सुट्टी असल्याने निवेदन घेण्यासाठी अधिकारी उपलब्ध नसल्याने आंदोलकांनी महावितरण कार्यालयात जाऊन ठिय्या आंदोलन सुरु केले. आंदोलकांनी मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्यांच्या कोरोनाच्या संकट काळातील वाढीव वीज बिलाबाबत सरकारने घेतलेल्या जनता विरोधी निर्णयाचा निषेध नोंदवला. पोलिसांच्या मध्यस्थीने अधिकार्‍यांना पाचारण करण्यात आले.

या आंदोलनात अ‍ॅड. कॉ. सुभाष लांडे, बहिरनाथ वाकळे, अंबादास दौंड, अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, महादेव पालवे, दिपक शिरसाठ, विजय केदारे, संतोष गायकवाड, दत्ताभाऊ वडवणीकर, तुषार सोनवणे, सतीश निमसे, अमोल पळसकर, आकाश साठे, आसाराम भगत, महादेव भोसले, प्रशांत चांदगुडे, सुनील ठाकरे, अमोल चेमटे, विकास गेरंगे, बाळासाहेब सागडे, वैभव कदम, रावसाहेब कर्पे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. सदर निवेदन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता विशाल बोंदर्डे व सहा. अभियंता रजत राऊत यांना देण्यात आले.

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here