शाळा उघडण्याची कार्यवाही सुरू; तर पुण्यात ३ डिसेंबरपर्यंत शाळा बंदच..!

अनेक राज्यांमध्ये शाळा सुरू होण्याची कार्यवाही गोंधळात असतानाच महाराष्ट्र सरकारने राज्यातील शाळा उघडण्यासाठी सोमवारचा मुहूर्त ठेवला आहे. पालकांवर पूर्ण जबाबदारी टाकून करोनाच्या कालावधीत शाळा सुरू होत आहेत. त्याचवेळी पुण्यात मात्र 3 डिसेंबर 2020 पर्यंत शाळा न उघडण्याचा निर्णय झाला आहे.

राज्य सरकारच्या आदेशाची औरंगाबादेत अंमलबजावणी होणार असून ग्रामीण भागातील शाळा येत्या सोमवारपासूनच सुरू होणार आहेत. मात्र औरंगाबाद शहरातील शाळा 3 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे.

तर, ण्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महापालिका आणि खासगी शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील काही ठिकाणच्या शाळा सुरु करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरु झाल्या आहे. मात्र कोरोना संसर्गाची स्थानिक परिस्थिती पाहून तेथील शाळा उघडण्याबाबतचा निर्णय जिल्हा प्रशासनावर सोपवला आहे.

संपादन : सचिन पाटील  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here