ऑकट्री करणार ‘त्या’ कंपनीत गुंतवणूक; पहा काय परिणाम होणार मार्केटवर

सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या जिओ मोबाईल सेवेच्या झंझावातात सरकारी कंपनी बीएसएनएलसह आयडिया, व्होडाफोन, टाटा आणि ऐअरटेल यांना झटका बसला आहे. टाटा कंपनीने या स्पर्धेत न पडण्याच्या उद्देशाने आपला टेलिकॉम बिजनेस आवरता घेतला आहे. अशावेळी ऐअरटेल एकटीच या सुलतानी संकटातून मार्ग काढत आहे. तर, आयडियाने व्होडाफोनची साथ घेऊन तगण्यासाठीची धडपड लावली आहे.

तगण्याच्या प्रयत्नातील आयडिया-व्होडाफोन यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात केस जिंकून भारत सरकारच्या दंड वसुलीला अडकाठी आणली आहे. आताही बाजारातून किमान 25 हजार कोटी रुपये जमा करून यातून मार्ग काढण्याची तयारी या संयुक्त कंपनीची आहे. त्याला यश मिळण्याची चिन्हे आहेत.

कारण, दूरसंचार कंपनी व्होडाफोन-आयडियात अमेरिकन अॅसेट मॅनेजमेंट कंपनी ऑकट्री कॅपिटलने कमीत कमी दोन अब्ज डॉलरची (१४८५३ कोटी रुपये) गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव दिला आहे. संभाव्य व्यवहारासाठी वरदेसह अनेक कंपन्यांसोबत गट बनवला आहे. या गुंतवणूकदार समूहाने २ ते २.५ अब्ज डाॅलरचा निधी व्होडाफोन-आयडियाला उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव दिला आहे. ऑकट्री, वर्दे व व्होडाफोन आयडियाच्या प्रतिनिधींनी याबाबत स्पष्ट संकेत दिलेले नाहीत. मात्र, सूत्रांकडून यावर आधारित बातम्या येण्यास सुरुवात झालेली आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here