लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांनी दिली ‘ही’ माहिती; पहा काय असणार आहे धोरण

धार्मिक उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम दणक्यात सुरू झालेल्या भारत देशात पुन्हा एकदा करोना विषाणूच्या रुग्णसंख्येचा स्फोट झाला आहे. अशावेळी गुजरात आणि मध्यप्रदेश राज्यातील काही शहरांमध्ये रात्रीचा कर्फ्यू लागू झालेला आहे.  त्यावर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

 आढावा बैठकीनंतर ते म्हणाले की, मध्यप्रदेशमध्ये पुन्हा लॉकडाउन होणार नाही. फक्त, जिथे कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे, त्या परिसरात नाइट कर्फ्यू लागू केला जाईल. ज्या शहरात कोरोनाचा पॉझिटिविटी रेट 5% पेक्षा जास्त आहे, तिथे रात्री 10 पासून सकाळी 6 वाजेपर्यंत कर्फ्यू असेल. अशात जिल्ह्यात क्राइसिस मॅनेजमेंट ग्रुपच्या बैठकीनंतर संबंधित जिल्हाधिकारी नाइट कर्फ्यू लावायचा किंवा नाही याचा निर्णय घेतील.

शाळा आणि महाविद्यालय उघडले जाणार नसल्याचे स्पष्ट करताना मुख्यमंत्री चौहान यांनी काळजी घेऊन सर्व व्यवहार करण्याचे आवाहन केले आहे. गुजरातच्या अहमदाबाद, सुरत, राजकोट व बडोद्यात शुक्रवारी रात्री ९ पासून सोमवारी पहाटे ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू झाली आहे. तसेच आता मध्यप्रदेशातील भोपाळ, इंदूर, ग्वाल्हेर, रतलाम व विदिशा या शहरात असा निर्णय लागू झालेला आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here