पहा शाळा उघडण्याबाबत काय परिस्थिती आहे देशभरात; वाचा महत्वाची बातमी

मुंबई महापालिकेने 31 डिसेंबरपर्यंत शाळा न उघडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी सणासुदीचा काळ संपल्यावर आणि मंदिरे व मस्जिद आणि सर्वच धार्मिक स्थळ उघडण्याचा निर्णय घेतला गेलेला असताना राज्यात पुन्हा एकदा रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.

गुजरात आणि मध्यप्रदेश येथील काही शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवत आहे. अशावेळी महाराष्ट्र राज्यातील शाळा सुरू होत आहेत. त्यामुळे पालकांमध्ये काळजीचे वातावरण आहे. तर, शिक्षकांनी आता शाळेत कसे होणार, याच भीतीने सरकारी आदेशाची अंमलबजावणी करण्याच्जी तयारी केली आहे.

हरियाणामध्ये शाळा सुरु केल्यावर १५० पेक्षा जास्त विद्यार्थी संक्रमित आढळले. मग या शाळा ३० नोव्हेंबरपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. गुजरातमध्येही २३ नोव्हेंबरपासून शाळा उघडणार होत्या. मात्र, हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. हिमाचलमध्ये २५ नोव्हेंबरपर्यंत शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय झालेला आहे. उत्तराखंडमध्ये शाळा उघडल्यानंतर फक्त ५ दिवसांतच बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, कर्नाटकात शाळा उघडल्या आहेत. तर, महाराष्ट्रात आता शाळा उघडल्या जाणार असून मुंबईत शाळा न उघडण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

गुजरातच्या अहमदाबाद, सुरत, राजकोट व बडोद्यात शुक्रवारी रात्री ९ पासून सोमवारी पहाटे ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू झाली आहे. तसेच आता मध्यप्रदेशातील भोपाळ, इंदूर, ग्वाल्हेर, रतलाम व विदिशा या शहरात असा निर्णय लागू झालेला आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here