म्हणून शेतकरी वापरतायेत ड्रोन; पहा केरळात फ्युचर फार्मिंगला कशी मिळतेय जोड

सध्या शेती असो की कोणताही व्यवसाय किंवा कारखाना. त्यामध्ये कुशल आणि प्रामाणिक मजूर न मिळण्याची समस्या मोठी आहे. अशावेळी करोना साथीच्या आजाराच्या काळात तर शेतकारी खऱ्या अर्थाने लॉकडाऊन झालेले आहेत. केरळमधील शेतकऱ्यांनी आता त्यावर उपाय म्हणून ड्रोन वापरास सुरुवात केली आहे,

एएनआय या राष्ट्रीय न्यूज वाहिनीने यावर स्पेशल रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. त्यांनी त्यात म्हटले आहे की, मजुरांच्या टंचाईमुळे शेतकरी ड्रोन वापरण्यासाठी आता तयार झालेले आहेत. शेतीत कीटकनाशक आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये यांच्या फवारणीसाठी आता सर्रास या ड्रोनचा वापर होऊ लागला आहे.

केरळ राज्यातील कुमाराकोम येथील कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने शेतकरी हे महत्वाचे तंत्रज्ञान वापरीत आहेत. मजूर मिळत नसल्याने हा एक उत्तम आणि सक्षम पर्याय असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here