अमृता फडणवीस यांच्या ट्रोलिंगवर पत्रकार परुळेकर यांनी म्हटले ‘हे’; आल्या ‘त्या’ प्रतिक्रिया

माजी मुख्यमंत्री आणि आताचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर सध्या राज्यभरातून ट्रोलिंग केली जात आहे. त्यावर पत्रकार राजू परुळेकर यांनी ट्विटर पोस्ट लिहिली आहे. अनेकांनी त्यावर आपले मत लिहिले आहे.

त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, अमृता फडणवीस यांच्यावर गिधाडी पद्धतीने केलेली व्यक्तिगत टिका मला आसुरी आणि पाशवी वाटते. महाराष्ट्र राज्य स्त्रीला स्वातंत्र्य आणि समानता प्रदान करणारं राज्य आहे. त्याला कमीपणा येऊ देऊ नका. अमृता फडणवीस यांनी त्यांच्या आवड़ीच्या क्षेत्रात यश मिळवावं. त्यांना खुप खुप शुभेच्छा.

यावर अयोध्या पौळ यांनी लिहिले आहे की, मी कधीही कुणावरही व्यक्तीगत टीका करत नाही पण मग भाजप समर्थक बाकी स्त्रीयांवर खूप खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात त्याबद्दलही बोला @rajuparulekarजी, त्यांच्यावर आले की victim card & women card खेळले जाते हे कुठले शहाणपण आहे?

ओमकार तोष्णीवाल लिहितात की, त्यांनी ही कंगना राणावत संस्कृति चा त्याग करूण, बेताल बोलन्यावर नियंत्रण ठेवुन महाराष्ट्र संस्कृति च अनुसरण कराव, हि समान्या वर्गा ची अपेक्षा ” जय महाराष्ट्र – जय जिजाउ – जय शिवराय “

आहों राजू जी…. भाजप चे राम कदम पोरगी उचलायची भाषा करतात, आमृताजी सरकारवर सारखी टोकाची टीका करतात ते चालत…आणि त्यांना कोणी काही बोललं तर स्त्री चा सन्मान स्वातंत्र्य याच्या गोष्टी करता, असे प्रसाद पथक यांनी लिहिले आहे.

हर्शल सरवणकर म्हणतात की, नेपोटिस्म च्या नावाने आरोळी ठोकणारे स्वतःच्या बायकांना अंगी कला नसताना अल्बम वगैरे काढतात ते सुद्धा टी सिरीजच्या बॅनर खाली. एवढे कलावंत मंडळी महाराष्ट्रात असताना कलेचा हा असा अवमान का? आणि महाराष्ट्रात नेहमीच महिलांचा आदर केला जातो पण महिलांनीही स्वतःची मर्यादा पाळली पाहिजे. दुसऱ्या प्रतिक्रियेत त्यांनी म्हटलेय की, नाहीतर आम्ही महाराष्ट्र स्वतःच्या सासऱ्याची मालमत्ता असल्यासारखा अंग्र्या जहाजावर नियम तोडून बसणार नाही.

सागर जगताप यांनी म्हटलेय की, कलेशी प्रामाणिक असणारे आणि मेहनती कलाकार मिळेल त्या प्लॅटफॉर्मवर कला सादर करत यशस्वी झाले.अभिजित सवंतही पूर्वी ऑर्केस्ट्रा मध्ये गायचा अस ऐकलंय नवरोबा मुख्यमंत्री नसताना ताई कधी आणि कशा कलेशी प्रामाणिक राहिलेत समजेल का?सर्व संधी, पुरस्कार सुद्धा नावऱ्याकडे पद आल्यावरच कसे मिळाले?

तर, समीर जगताप यांनी म्हटले आहे की, तुमच्या मते स्त्री स्वातंत्र म्हणजे पतीच्या पदाचा वापर करून प्रसिद्धी मिळवणे, कुठल्याही राजकीय पदावर नसताना राजकीय टोलेबाजी करणे आहे का? तुमच्या मते पवार साहेबांच्या पत्नीला, विलासराव देशमुखांच्या पत्नीला स्वातंत्र नव्हते का?

विजय कडलग यांनी प्रतिक्रिया दिलीय की, राजु सर तुमचे म्हणने बरोबर आहे. छत्रपतींच्या राज्यात हे व्हायला नको. पण… पण एका स्रीने तिच्या मानमर्यादा पाळल्या पाहिजे. घाणीत दगड मारल्यावर शिंतोडे आपल्याही अंगावर उडतात. महाराष्ट्रातील कोणत्या नेत्याच्या बायकोने खालच्या पातळीवर विरोधकांवर टिका केली ते सांगा.

त्यांची टीकाही वैयक्तिक आसुरी असते,पक्षाच्या धोरणावर केली तर कोणी करणार नाही,स्वतंत्र व्यक्तिमत्त्व स्त्री नेत्या खूप आहेत,त्या कधी अशा व्यक्तिगत टीका करत नाहीत,अमृत मुखी विष जास्त बाहेर येत,पण आपण चिखल उडवायचा मग आपल्या ही अंगावर चिखलफेक होणारच की, असे राजेंद्र शिंदे यांनी म्हटलेय.

उदय भूरगुडे यांनी म्हटलेय की, होय बरोबर आहे सर तुमचं पण अमृता फडणवीस पण काय कमी नाहीत त्यांनी पण आपल्या मर्यादा सांभाळून बोलायला पाहिजे. अनेक माजी मुख्यमंत्री होऊन गेले पण त्यांच्या पत्नी कधीही अशा वागल्या नाहीत अगर कोणावरही अशी टीकाटिप्पणी केली नाही.

अमित चौधरी यांनी लिहिलेय की, मान्य सर पण सुरुवात त्यांच्याच भक्तांनी केली, जस राहुल गांधी, आदित्य ठाकरे, अशी अनेक उदाहरणं आहे. त्यामुळे कार्यकर्ते एका लिमिट पर्यंत आपल्या नेत्यावरची खालची टीका सहन करू शकतात पण नंतर boomrang होणारच ना, त्यामुळे हे boomrang आहे, जे त्यांनीच पेराल आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here