धक्कादायक : म्हणून मोबाईलच्या रिचार्ज व बिलामध्ये होणार 20 टक्के वाढ..!

मोफत किंवा कमी दरामध्ये सेवा देऊन ग्राहकांना इंटरनेट आणि मोबाईलवर बोलण्याची सवय लावल्यावर आता त्याचे दर वाढवण्याची सुरुवात कंपन्यांनी केली आहे. त्यानुसार आता महिना-दीड महिन्यात यात किमान 10 ते 20 टक्के इतकी मोठी दरवाढ होण्याची शक्यता आहे.

 व्होडा-आयडिया, एअरटेल व रिलायन्स जिओ लवकरच सेवा महाग करण्याच्या तयारीत आहेत. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या अहवालानुसार असे दिसते की, मोबाईल कंपन्यांनी दरात २० टक्के वाढ झाल्यास एअरटेलचा प्रतिव्यक्ती महसूल वाढून १७८ रुपये, जिओचा १६७ रुपये व व्होडा-आयडियाचा महसूल १४० रुपये झालेला असेल. महसुलातील वाढीमुळे यातील व्होडा-आयडिया कंपनीचा रोकड प्रवाह तर वाढेल, पण त्यांचा खर्च भागणार नाही.

मात्र, ग्राहकांना याचा मोठा झटका सहन करावा लागणार आहे. बहुतांश आर्थिक उलाढाल कोरोनाच्या आधीच्या पातळीवर गेल्याने अपेक्षेआधीही दरात वाढ होऊ शकते.  दूरसंचारचे दर वाढणे नक्की आहे. फक्त ते नूतन वर्षाच्या आधी वाढतात की नवीन वर्षानंतर हे बघावे लागेल. त्यांच्यानुसार दरात १० टक्क्यांच्या आसपास वाढ होऊ शकते. यासाठी व्होडा-आयडिया पहिले पाऊल टाकील, असे तज्ञांना वाटते.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here