पंजाबी शेतकऱ्यांनी दिला कौल; अखेर 15 दिवसांसाठी रेल्वे नाकेबंदी उठवली..!

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कायद्यांना असलेला विरोध दर्शवताना पंजाब राज्यातील शेतकऱ्यांनी महिनोन्महिने जोरदार आंदोलन केले आहे. त्यामुळे या राज्यातुल रेल्वे सेवा ठप्प आहे. मात्र, आता मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या विनंतीला मान देऊन शेतकऱ्यांच्या संघटनेने 15 दिवसांसाठी रेल्वे सेवा देण्यासाठी हिरवा कंदिला दाखवला आहे.

शेतकरी एकजुटीने काय होऊ शकते याची साक्ष पुन्हा एकदा पंजाबी शेतकऱ्यांनी पटवून दिली आहे. त्यानुसार आता पुढील 15 दिवस या राज्यातील रेल्वे सेवा शेतकऱ्यांच्या मदतीने सुरळीत होत आहे. मात्र, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात असलेले अन्याय्य कायदे मागे न घेतल्यास पुन्हा एकदा उग्र आंदोलन करण्याची घोषणा शेतकऱ्यांच्या संघटनेने केली आहे.

कृषी सुधारणा विधेयक हे शेतकऱ्यांच्या नाही तर देशातील मोजक्या उद्योजकांच्या हिताचे असल्याचे आरोप पंजाबमधील शेतकऱ्यांचे आहेत. त्यासाठी त्यांनी आपल्याला मान्य नसणारे हे कायदे रद्द करण्याची आग्रही मागणी केली आहे. त्यामुळे या राज्यातील व्यवहार ठप्प आहेत. मात्र, तरीही केंद्र सरकारने या आंदोलनाची दखल घेतलेली नाही.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here