MP नंतर UP मध्येही लव्ह जिहाद चर्चेत; ‘त्या’ आठ राज्यांमध्ये आहेत धर्मपरिवर्तनविषयक कायदे..!

मध्यप्रदेश सरकारने लव्ह जिहाद हा मुद्दा आता थेट राजकीय करून त्याला आळा घालणारे कायदे आणण्याची तयारी केली आहे. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या उत्तरप्रदेश राज्यातही आता असाच कायदा केला जाणार आहे.

कानपूर, बागपत, मेरठसह उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये वारंवार होणार्‍या लव्ह जिहादच्या घटनांनंतर उत्तरप्रदेश राज्यात अशा कायद्याची मागणी काही धार्मिक संघटनांनी केली होती. त्यानुसार गृह विभागाने न्याय व कायदा विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे. अजामीनपात्र कलमांत गुन्हा नोंदवला जाईल आणि दोषी आढळल्यास 5 वर्षांची कठोर शिक्षा अशी तरतूद आहे.

कायदा आयोगाचे प्रमुख आदित्य नाथ मित्तल यांनी याबाबत सांगितले की, 2019 मध्येच या मुद्याचा मसुदा सादर केला होता. त्यात आतापर्यंत तीन वेळा बदल करण्यात आले आहेत. शेवटच्या बदलामध्ये शिक्षेची तरतूद आहे. लग्नासाठी चुकीच्या हेतूने धर्मांतर करण्यासाठी किंवा धर्मांतरासाठी केलेले विवाह देखील धर्मांतर कायद्याच्या अंतर्गत येतील. जर एखाद्याने धर्मांतर करण्यासाठी एखाद्याला मानसिक आणि शारीरिक छळ दिला तर तेही या नव्या कायद्याच्या कक्षेत येतील. धर्मांतर झाल्यास, पालक, भावंड किंवा इतर ब्लड रिलेशनच्या कुणी तक्रार केल्यास त्यांच्या तक्रारीवर कारवाई सुरू केली जाऊ शकते.

अरुणाचल प्रदेश, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, झारखंड आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये धर्म परिवर्तन रोखण्यासाठीचे कायदे आहेत. ओडिशाने 1967 मध्ये सर्वप्रथम हा कायदा केला होता. आता त्यात लव्ह जिहाद याची जोड देऊन राजकीयदृष्ट्या या कायद्यांना आणखी महत्व आलेले आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here