‘त्या’ मॉडेलच्या फ्यूल पंपांमध्ये दोष; कंपनीने मागवल्या सर्वच गाड्या परत

दिल्ली :

२ दिवसांपूर्वी जनरल मोटर्सने जगभरातील सुमारे 69 हजार शेवरलेट बोल्ट इलेक्ट्रिक कारला परत मागवतल्या होत्या. ही वाहने परत मागवण्याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये  वाहनांमध्ये असलेल्या बॅटरीला आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या. आत अशातच कार निर्मिती करणारी कोरियन कंपनी किया मोटर्सनेही किया सेल्तोस (Kia Seltos) या गाड्या परत मागवल्या आहेत. फ्यूल पंपांमध्ये मोठा दोष आढळून आला असल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. या कारच्या डिझेल व्हेरिएंटमधील सर्व गाड्या परत मागवल्या आहेत

विशेष बाब म्हणजे गाड्यांच्या बाबतीत सध्या चर्चेत असलेला मुद्दा कारचा क्रॅश टेस्टमध्येही या कारला बरे गुण मिळालेले आहेत. आजवर 1.25 लाखांहून अधिक सेल्टॉस कार्सची विक्री भारतात केली गेली. ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये या कारला 3 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

कार परत मागवल्यानंतर आम्ही कारच्या इंधन पंपाची तपासणी करु, त्यामध्ये कोणताही दोष आढळल्यास आम्ही मोफत दुरुस्त करुन देऊ, आणि जर पंपामध्ये कोणताही दोष आढळला नाही तर तो पंप न बदलला पूर्ण तपासणी करु कार परत करु, अशी माहिती आपल्या ग्राहकांना कंपनीने दिली आहे.

या कारची एक्स-शोरूम किंमत 9.89 लाख रुपये इतकी आहे. सध्या या गाड्यांची चलती आहे. या कार्सने भारतातील मार्केटवर बऱ्यापैकी पकड मिळवली होती. दरम्यान कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 1 ऑक्टोबर 2019 ते 13 मार्च 2020 या दरम्यान बनवलेल्या सेल्टॉस कारच्या सर्व डिझेल व्हेरिएंटच्या इंधन पंपांमध्ये दोष आढळला आहे. त्यामुळे आम्ही डिझेल व्हेरिएंटच्या सर्व कार परत मागवल्या आहेत. इंधन पंपातील या त्रुटीमुळे कारचं मोठं नुकसान होऊ शकतं, त्यामुळेच आम्ही रिकॉलचा निर्णय घेतला आहे.       

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here