एव्हरेज आणि मायलेजमध्ये असतोय ‘हा’ महत्वाचा फरक; जाणून घ्या रंजक माहिती

जेव्हा आपण एखादी गाडी खरेदी करायला जातो तेव्हा तेथील शोरूमचे प्रतिनिधी एकदा मायलेज आणि एकदा एव्हरेज असा उच्चार करत असतात. बऱ्याचदा आपल्याला गाडीची माहिती सांगण्यासाठी जे माहितीपत्रक दिले जाते. त्यातही एव्हरेज आणि मायलेज सेपरेट लिहिलेले असते. आणि दोन्हीसमोरील आकडाही वेगळा असतो. एव्हरेज आणि मायलेजमध्ये निघणाऱ्या आकड्यात फार फरक नसला तरी फरक मात्र असतोच.

जगातील कुठलीच कंपनी ठामपणे मायलेज सांगू शकते. मात्र एव्हरेजविषयी कधीच ठामपणे सांगत नाही. कारण त्या दोन्हींमध्ये फरक असतो.काही नियम आणि अटी लावून गाडीने डिझेलच्या किंवा पेट्रोलच्या प्रमाणात किती अंतर पार केले त्याला गाडीचा मायलेज म्हणतात. तर विना कोणत्या नियम आणि अटीं शिवाय गाडीने डिझेल किंवा पेट्रोल च्या प्रमाणात किती अंतर पार केले त्याला गाडीचा एव्हरेज म्हणतात.

म्हणजे मायलेज काढताना गाडीचा रस्ता प्लेन असावा, गाडी एकाच स्पीडमध्ये चाललेली पाहिजे, असे काही नियम असतात.मात्र एव्हरेजमध्ये असे काही नसते, कितीही खराब रस्ता असू द्या, गाडी चालवण्याची पद्धत कितीही बेकार असू द्या, एव्हरेज काढलेच जाते. जे अर्थात मायलेजपेक्षा कमी निघते. या एकाच कारणामुळे शोरूममध्ये गाड्यांचे मायलेज सांगितले जाते.  

आता महत्वाची आणि रंजक माहिती आपल्या जवळच्या लोकांना शेअर करा कारण की ज्ञान हे वाटल्याने वाढते.         

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here