निरंतर संघर्षाची प्रेरणा ‘त्यांच्याकडूनच’ मिळाली आहे; वाचा कुणाविषयी आहेत हे राज ठाकरेंचे उद्गार

मुंबई :

आज प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे. याच निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करत अभिवादन केले आहे.

राज ठाकरे यांची पोस्ट जशीच्या तशी :-

‘जिथे जिथे अन्याय दिसेल तिथे तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे’ ही शिकवण आमचे आजोबा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे ह्यांची. ‘उक्ती आणि कृती’ ह्यांचा उत्तम मेळ कसा असावा, हे आजोबांच्या आयुष्याकडे बघितलं की लक्षात येतं. लोकहितवादी, आगरकर आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या समाजसुधारणांना पुढे नेणारे ते निडर समाजसुधारक होते. पाखंडी मानसिकता, अनिष्ट रूढी, जाती-व्यवस्था ह्या विरोधात दोन हात करण्यासाठी त्यांनी वक्तृत्व, लेखन आणि प्रत्यक्ष कृती ही शस्त्र वापरली. पुढे वय झालेलं असताना देखील त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रिय सहभाग घेतला, ह्या चळवळीतील विविध पक्षांना, विचारधारांना एकत्र बांधून ठेवणं निव्वळ त्यांनाच शक्य होतं. कुठल्याही चुकीच्या गोष्टीच्या विरोधात संघर्ष करताना त्यांचं वय कधीच आड आलं नाही आणि त्याच ताकदीने ते आसूड ओढत राहिले. निरंतर संघर्षाची प्रेरणा त्यांच्याकडूनच मिळाली आहे. आजोबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन…

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here