गाड्यांवर असणाऱ्या लोगोमागचे रहस्य जाणून व्हाल आश्चर्यचकित; वाचा रंजक माहिती

आपण प्रत्येक गाडीच्या पाठीमागे लोगो पाहत असतो. मात्र आपल्याला त्याचे अर्थ आणि त्यामागचे रहस्य माहिती नसते. आज आपण जाणून घेऊयात रंजक माहिती.

१)     Audi (ऑडी) :- ऑडी हि कंपनी चार वेगवेगळ्या कंपन्यांना एकत्र करून बनलेली आहे. म्हणून तिच्या लोगोत चार वर्तुळे एकमेकांशी कनेक्टेड दाखवलेली आहेत.

२)     Lamborghini (लॅम्बोर्गिनी) :- लॅम्बोर्गिनीच्या कंपनीचे मालिक फेरूक्रिओ लॅम्बोर्गिनी यांच्यावरून गाडीला ते नाव देण्यात आले. फेरूक्रिओ लॅम्बोर्गिनी यांची रास वृषभ आहे. वृषभ म्हणजे बैल. म्हणून गाडीच्या लोगोत बैल आहे.

३)     Hyundai (ह्युंदाई) : सर्वसाधारणपणे पाहिल्यास ह्युंदाईच्या लोगोत H दिसून येतो. मात्र बारकाईने पाहिल्यास दोन व्यक्ती एकमेकांना हस्तांदोलन करताना दिसत आहेत. ग्राहकांशी असलेला कनेक्ट यातून दाखवायचा आहे.

४)     Toyota (टोयोटा) :- टोयोटा ही धागे बनवणारी कंपनी होती. त्याचे प्रतिबिंब लोगोत जाणवते.  जर लोगोच्या प्रत्येक भागाला वेगळे केले तर टोयोटा कंपनीचे नाव आपल्याला बनताना दिसते.

५)     BMW :-  BMW मध्ये असणारा पांढरा भाग आणि निळा भाग हा त्यांच्या देशाच्या ध्वजाच्या रंगामधून घेण्यात आला आहे. BMW चा फुल फॉर्म असा आहे Bayerische Motoren Werke.

६)     Mercedes (मर्सिडीज) :- मर्सिडीजचा अर्थ होते आनंद आणि लोगोचा अर्थ असा होतो की पाणी, हवा, आणि जमीन ह्यांच्यावर वर्चस्व असल्याचे हा लोगो दर्शवतो.

७)     Ferrari (फेरारी) :-  फेरारी कंपनीचा मालक जेव्हा एका जेट फायटर सैनिकाच्या आई वडिलांना भेटला. तेव्हा त्यांनी सुचवले की, जेट फायटर असणाऱ्या मुलाच्या कपड्यांवरील घोड्याचा लोगो कंपनीच्या कारवर लावा. हा लोगो तुला प्रगती देईल.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here