‘या’ जिल्ह्यांमध्ये पुन्हा पावसाचे अस्मानी संकट; वाचा कोणकोणत्या जिल्ह्यात होणार मध्यम पाऊस

पुणे :

राज्यातील अनेक भागात पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. तरीही कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर राहणार आहे. पुढील दोन ते तीन दिवसानंतर पावसाचा जोर आणखी कमी होईल. बुधवारी पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, नांदेड, लातूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

अरबी समुद्राच्या पश्चिम मध्य भागात व परिसरात कमी दाबाचे क्षेत्र आहे. तसेच बंगालच्या उपसागर परिसरात चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे. ही स्थिती दोन दिवसांत उत्तर पश्चिम भागाकडे सरकण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात काही प्रमाणात हवामान राहणार असून येत्या शनिवारपर्यत कमीअधिक स्वरूपात पाऊस पडणार आहे. तसेच काही ठिकाणी कडाक्याचे ऊन पडणार असून ऑक्टोबर हिटचा चटकाही वाढण्याची शक्यता आहे.

सध्या राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे हवेत काही प्रमाणात गारवा तयार होत असून किमान तापमानात चढउतार होत आहे. गुरूवारी रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सांगली, सोलापूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम, यवतमाळ व नागपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडेल असा वर्तवण्यात आला होता.

दरम्यान, शुक्रवारपासून पावसाचा प्रभाव कमी होणार असला तरी काही ठिकाणी जोरदार पाऊस पडले. अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असून मराठवाडा व विदर्भात काही अंशी ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडतील. तर शनिवारी अकोला, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यात काहीसा पाऊस पडणार असून इतर भागात उघडीप राहणार आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here