हे भन्नाट जोक्स वाचून आवरणार नाही हसू; पांचट जोक्सवर हसा चकटफु

1) खोटं बोलायला पण काही लिमिट असते….

काल एकाला उधारी मागण्यासाठी घरच्या लँडलाईन वर फोन केला तर तो म्हणतो,

“अरे यार, थोडा वेळाने फोन कर मी आता गाडी चालवतोय..

2) एक वेळेस हरवलेले प्रेम परत मिळेल पण,
मित्राला दिलेला गॉगल कधीच परत मिळत नाही..

आखिल भारतीय पाच मिनिटात परत देतो संघटना !!

3) मन्या : काल तुझा मूड ऑफ का होता माझ्याशी बोलताना,
आणि आज एकदम मूडमध्ये?

गणु: काल यार बायकोने वीस हजार साड्यांवर उडवलेत

मनू: मग आज मूड ऑन कसा

गणू: आज त्या साड्या घेऊन तुझ्या बायकोला दाखवायला गेलीय

4) राहुल: डोळा का सूजला ?

अमित: काल बायकोचा वाढदिवस होता. केक आणला होता.
राहुल: पण डोळा का सूजला?

अमित: बायकोचे नाव कृती आहे. पण त्याने त्यावर लिहिले….
“Happy Birthday Kutri”

5) आमचा निम्मा वेळ क्रिकेट खेळताना हरवलेला बॉल सापडण्यात जायचा नाहीतर

आम्हीपन टीम इंडियात सिलेक्ट झालो असतो.

6) काही कळत नाही राव.

पगारवाढ मागितली की बॉस म्हणतो “तू काय काम करतोस “;

आणि रजा मागितली की म्हणतो “तुझं काम कोण करणार “

7) परिक्षा हॉल..

Mangya: २ रा प्रश्नाचे उत्तर दाखव
Barkya: नाही लिहले

Mangya: ३ रा
Barkya: नाही

Mangya: ४, ५, ६,
Barkya: नाही,नाही,नाही.

Mangya: तु फक्त पास तर हो रे..
तुला मारला कसा ते सावधान इंडिया मध्ये दाखवतील.

8) एक मुलगी होती
.
बीना तिचं नाव होतं
.
ती खूप हुशार होती
.
ती दाता ची डॉकटर झाली
.
तिने दवाखाना टाकला आणि दवाखान्याला हौसेने स्वतःचं नाव दिलं
.

“बिना दातांचा दवाखाना” 

9) बंड्या: १४ फेब्रुवारीला काय हाय बे?

पिंट्या: तुला बायको किंवा गलफ्रेंड हाय?
बंड्या: दोनीबी नाय.

पिंट्या: मंग हनुमान जयंती हाय.
अखिल भारतीय खुलता कळी खुलेना आमच कुठेच जुळेना संघटना

10) ज्योतिषी: तुझे नाव झंप्या आहे?
झंप्या: हो..

ज्योतिषी: तुला एक मुलगा आहे?
झंप्या: हो.. ज्योतिषी महाराज

ज्योतिषी: तू आत्ताच पाच किलो गहू घेतले.
झंप्या: तुम्ही अंतर्यामी आहात महाराज.

ज्योतिषी: मुर्खा, पुढच्या वेळी येताना पत्रिका घेऊन ये. रेशनकार्ड नको! 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here