शिवरायांवरील ही जबरदस्त व्हायरल कविता; वाचून मिळेल जबरदस्त प्रेरणा

आमच्या शिवरायांचे वादळ अजून
थोडा वेळ जरी घोंगावले असते तर,
त्यांनी हिंदुस्थानाच काय पण
उभ्या जगालाच आपल्या कवेत घेतले असते..

आमच्या शिवरायांच्या पराक्रमच्या तोफा अजूनकाही काळ
जर धगधगत राहिल्या असत्या तर,
त्यांनी आज
सातासमुद्रापारही स्वराजाच्याच
नौबती झाडल्या असत्या.

आमच्या शिवरायांसाठी नियती थोडी जरी सबुरीने
वागली असती तर,
त्यांनी जमिनीवरच काय पण समुद्रावरही हुकुमत गाजवली असती.

आमच्या शिवरायांची समशेर अजून
थोडी जरी तळपली असती तर ,
आज ब्रिटेनच्या राणीनेही “जय जिजाऊ, जय शिवराय” ची आरोळी ठोकली असती.

आमच्या शिवरायांच्या आयुष्याचा दोर
अजून थोडा मजबूत असता तर,
त्यांनी लाल किल्यावारच काय “व्हाईटहाउस”वरही भगवा झेंडा फडकवला असता.

(कविता स्रोत :- समाजमाध्यम साभार)

कविता आवडली असेल तर नक्कीच शेअर करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here