भारतीयांना नेटफ्लिक्सकडून खुशखबर : ‘एवढ्या’ दिवसांसाठी नेटफ्लिक्स फुकट पाहता येणार

मुंबई :

नेटफ्लिक्स आता जबरदस्त लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे. आपल्याकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विशेषकरून भारतीयांना जवळ करण्यासाठी नेटफ्लिक्सने एक ढान्सू ऑफर दिली आहे. भारतात दोन दिवसांसाठी नेटफ्लिक्सने मोफत सबस्क्रिप्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. ही मोफत सेवा Netflix StreamFest अंतर्गत युझर्सनाही देण्यात येणार आहे.

नेटफ्लिक्सने केलेल्या या मोठ्या घोषणेमुळे बाकीच्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सना धक्का बसला आहे. ५ डिसेंबर रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते ६ डिसेंबर ११.५९ पर्यंत नेटफ्लिक्स मोफत पाहता येणार आहे. युझर्सची संख्या स्ट्रीम फेस्टदरम्यान मर्यादित केली जाणार आहे. जर यादरम्यान StreamFest is at capacity हा मेसेज तुम्हाला दिसला तर तुम्ही कधी नेटफ्लिक्स पाहू शकाल, हे तुम्हाला सांगितले जाईल.

कोणत्याही प्रकारचे प्रिमिअम कंटेट नेटफ्लिक्सच्या या फेस्टदरम्यान युझर्सना पाहता येणार आहे. तसेच त्यांना यासाठी पैसैही मोजावे लागणार नाहीत. पण युझर्सना यासाठी ईमेल आयडी अथवा मोबाईल क्रमांकाद्वारे साईन इन करावे लागणार आहे. ज्या कंटेटचा अॅक्सेस प्रिमिअम युझर्सना दिला जातो, तो सर्व कंटेट युझर्सना या दोन दिवसांत मोफत पाहता येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. दरम्यान, आपल्या क्रेडिट अथवा डेबिट कार्डाची माहितीही साईन अप केल्यानंतर द्यावी लागणार नाही.

संपादन : स्वप्नील पवार       

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here