‘या’ बड्या कंपनीला भेटले बुलेट ट्रेनचे सुमारे सात हजार कोटींचे कंत्राट

दिल्ली :

केंद्र सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी मुंबई ते अहमदाबाद वेगवान बुलेट ट्रेन असलेला प्रोजेक्टचे कंत्राट एका बड्या कंपनीला भेटले आहे.  मुंबई ते अहमदाबाद वेगवान बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या काही भागांच्या बांधकामाचे कंत्राट सध्या विविध क्षेत्रात आघाडीवर असलेल्या लार्सन अॅण्ड टुब्रो कंपनीला मिळाले असल्याची माहिती कंपनीकडूनच मिळाली आहे.

या कंत्राटाची रक्कम किती हे मात्र अद्याप कंपनीने गुलदस्त्यात ठेवले आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कंत्राटाची किंमत सात हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पेरेशन लिमिटेडने मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गापैकी 87.569 कि.मी. मार्गाचे बांधकाम करण्याची जबाबदारी एल अॅण्ड टी कंपनीला दिली आहे. या कंत्राटाच्या कामात व्हायडक्ट्स, एक स्थानक, महत्त्वाचे नदींवरील पूल, मेन्टेनन्स डेपो आणि इतर पूरक कामांचा समावेश आहे.

सुमारे 508 कि.मी.च्या मुंबई ते अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरीडॉरमध्ये समांतर रस्ते मार्गासह 12 स्थानकांचा तसेच महाराष्ट्र, दादरा व नगर हवेली केंद्रशासित प्रदेश आणि गुजरातचा अंतर्भाव आहे.

हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद हे अंतर दर ताशी 320 कि.मी.च्या वेगाने मर्यादित थांबे घेत दोन तासांत तर सर्व थांबे घेत तीन तासांत कापणार आहे. मुंबई शेअर बाजारात एल अॅण्ड टीचे शेअरमध्ये आज 1.24 टक्के वाढ होत 1161.95 रुपयांवर ते स्थिरावले होते.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here